google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 काँग्रेस महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार

Breaking News

काँग्रेस महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार

 काँग्रेस महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढविणार


काँग्रेस पक्ष आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावरच लढवेल अशी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. विशेष म्हणजे आज नाना पटोले दिल्लीत असून त्यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या भेटीनंतर ही घोषणा केली आहे. राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटीत राहुल यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्यास हिरवा कंदील दिल्याची माहिती नाना पटोलेंनी दिल्यामुळे राज्यातील राजकारणात महाविकास आघाडीवर त्याचा परिणाम पाहायला मिळू शकतो.काँग्रेस पक्ष संघटन वाढीसाठी राज्यात मोठी स्पेस असल्यामुळे सखोल चर्चेनंतर निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोलेंनी सांगितले.राहुल गांधी यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली. यापुढील काळात राज्यात पक्षवाढीसाठी काय केले पाहिजे, यासाठी बैठकीत चर्चा झाली. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, त्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मिळाल्याचे नाना पटोले म्हणाले

Post a Comment

0 Comments