सीईटीची चिंता नको , सर्वांनाच मिळणार अकरावीला प्रवेश ! दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची चिंता लागली आहे.
सोलापूर : दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची चिंता लागली आहे. परंतु, जिल्ह्यात विज्ञान (Science) व वाणिज्य शाखेची प्रवेश क्षमता 65 हजारांहून अधिक आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शाखेला प्रवेश मिळेल, असा विश्वास माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्कर बाबर यांनी व्यक्त केला आहे निलंबित आमदारांना वेतन व भत्ता नाहीच! आमदारांना दरमहा "इतके' वेतन कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत आणि त्यामुळे नववीचे गुण, अंतर्गत मूल्यमापनातून हा निकाल जाहीर करण्यात आला.त्यामुळे जिल्ह्यातील 68 हजार विद्यार्थ्यांपैकी 50 हजार विद्यार्थी डिस्टिंक्शन व प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे यंदा कला शाखेच्या तुलनेत विज्ञान व वाणिज्य शाखेला प्रवेश वाढतील, असा अंदाज आहे. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक शिक्षणाकडेही विद्यार्थ्यांचा कल वाढल्याचे चित्र आहे. दरम्यान, मागील वर्षी जिल्ह्यातील अकरावीची प्रवेक्ष क्षमता 59 हजार 248 होती. त्यापैकी विज्ञान शाखेला 18 हजार 86 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. जिल्हाभरात चार हजार 74 जागा रिक्त राहिल्या होत्या. दुसरीकडे वाणिज्य शाखेच्या अडीच हजारांहून अधिक जागांवर विद्यार्थीच मिळाले नाहीत. चिंतेची बाब म्हणजे कला (Arts) शाखेच्या दहा हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदा अकरावीची प्रवेश क्षमता वाढल्याने सर्वांनाच प्रवेशाची संधी मिळणार आहे."जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!'दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाची चिंता करू नये. जिल्ह्यातील महाविद्यालयांची संख्या आणि त्यातील प्रवेश क्षमता पाहता सर्वांनाच प्रवेश मिळणार आहे. महाविद्यालय स्तरावर मेरिट लिस्ट लावून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक गुरुवारनंतर जाहीर होईल.
- भास्कर बाबर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर
शाखानिहाय प्रवेश क्षमता
शाखा : कॉलेज : प्रवेश क्षमता
विज्ञान : 198 : 29,237
वाणिज्य : 215 : 36,171
कला : 112 : 11,328
एकूण : 428 : 76,736
50 हजार विद्यार्थ्यांना 76 टक्क्यांपेक्षा अधिक गुण
दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील 68 हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून अवघे चार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. त्यात जवळपास 27 हजार विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये तर 23 हजार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तसेच द्वितीय श्रेणीत 18 हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 273 विद्यार्थ्यांना 50 टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळाले आहेत. निकालाची टक्केवारी यंदा वाढल्याने बहुतेक विद्यार्थ्यांचा कल विज्ञान, वाणिज्य शाखा आणि व्यावसायिक शिक्षण आयटीआयकडे वाढला आहे.
0 Comments