विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा आज सांगोला दौरा : तालुक्यात विविध ठिकाणी घोंगडी बैठकीचे आयोजन !
सांगोला / प्रतिनिधी : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर ( शेठ ) यांचा आज बुधवार दि . २१ जुलै रोजी सांगोला तालुक्यात येत असून विविध ठिकाणी घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . सांगोला तालुका . . यावेळी ते विविध समाजाचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत दौऱ्यामध्ये सकाळी ९ .०० वाजता खंडोबा मंदिर कोळा येथे लोणारी , होलार व नाभिक समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर ९ वाजून ४५ मिनिटांनी श्री . संत पांडुरंग महाराज मठ येथे बहुजन समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे . त्यानंतर १० वाजून ३० मिनिटांनी यलमार मंगेवाडी येथे यलमार व रामोशी समाज बांधवांसमवेत घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे . त्यानंतर ११ वाजून १५ मिनिटांनी श्री . सत सेना महाराज मठ सांगोला येथे नाभिक समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे . दु . १२.०० वाजता अंबाबाई मंदिर सांगोला येथे वाघ्या मुरळी , डवरी मरीआई गाडीवाले समाजातील नागरिकांसमवेत घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . त्यानंतर १२ वाजून ३० मिनिटांनी धनगर समाज मंदिर सांगोला येथे कोष्टी , तेली , वाणी व धनगर समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन केले आहे . तर दु . १.०० वाजता , सांगोला येथे माळी समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी ते सर्व समाजाच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करणार आहेत .
0 Comments