google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! मंगळवेढ्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून -

Breaking News

धक्कादायक! मंगळवेढ्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून -

 धक्कादायक! मंगळवेढ्यात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून - 


मंगळवेढा तालुक्यातील धर्मगांव येथे एका इसमाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने २५ वर्षीय पत्नीस निर्जन स्थळी नेवून स्कार्पच्या साह्याने गळा आवळून खून केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी पोलिसांनी पती संजय दगडू खरात याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवून अटक केली आहे.या घटनेची हकीकत अशी , यातील आरोपी संजय खरात हा त्याची मयत पत्नी पुनम संजय खरात (वय २५) हिच्यावर धर्मगावातील एका युवकाबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून वारंवार पत्नीस शिवीगाळ दमदाटी सुर्यकांत करून मारहाण करीत असे.मंगळवेढा शिवारातील भालदार यांच्या शेतात निर्जनस्थळी पत्नीस नेवून प्रथम हाताने गळा आवळून नंतर स्कार्पने गळा आवळला व हात पाय मोडून तिचा खून केला असल्याची फिर्याद मयत पुनमची आई सुजाता गाडेकर रा.तांदळवाडी ता.द.सोलापूर यांनी दिल्यानंतर आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आवटे हे करीत आहेत. दरम्यान , सोलापूर ग्रामीणचे होम डी.वाय.एस.पी. सुर्यकांत पाटील यांनी सदर घटनास्थळाला भेट देऊन खूनामागील कारणमिमांसा जाणून घेतली.

Post a Comment

0 Comments