बहुजन समाज पार्टी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि . १३ जुलै रोजी भव्य एक दिवशीय धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे
सांगोला / प्रतिनिधी : बहुजन समाज पार्टी तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि . १३ जुलै रोजी भव्य एक दिवशीय धरणे आंदोलनाचे नियोजन करण्यात आले आहे . सदर एक दिवसीय धरणे आंदोलन हे विविध विषयांवर आधारित आहे . या धरणे आंदोलनातील प्रमुख मागण्या अनुसूचित जाती - जमातीच्या कर्मचार्यांच्या पदोन्नती मधील आरक्षण कायम ठेवण्यात यावे . ओबीसींच्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे . ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे .शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा . पेट्रोल - डिझेलच्या किमती कमी करण्यात याव्यात . घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात याव्यात . खाद्यतेलाचे भाव कमी करण्यात यावे . वाढत्या महागाईला कमी करण्यात यावे . कोरोनामुळे हात गायीस आलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे . कोविड १ ९ मुळे मृत पावलेल्या मृतकांच्या परिवारांना आर्थिक सहकार्य देण्यात यावे . या प्रमुख मागण्यांसाठी सदर आंदोलन हे राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यालयासमोर होणार आहे . त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात समोर सदर चे एक दिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे . सदर आंदोलनासाठी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व कर्मचारी , अधिकारी , असंघटित कामगार , नोकरदार , विद्यार्थी या सर्वांनी सदर मागण्यांसाठी धरणे आंदोलनास पाठिंबा देऊन दि . १३ जुलै रोजी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवावा व सदर चे धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन सांगोला विधानसभा युनिट तर्फे करण्यात येत असून या आंदोलनासाठी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी बहुजन विचार वादी कार्यकर्त्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावून सर्वांचा सहभाग आंदोलनामध्ये कसा होईल याची काळजी घ्यावी . असेही आवाहन सांगोला विधानसभा युनिट तर्फे करण्यात येत आहे .
0 Comments