google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने भररस्त्यात गळा चिरून तिचा खून केला ; नंतर स्वतः हजर झाला पोलीस ठाण्यात !

Breaking News

पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने भररस्त्यात गळा चिरून तिचा खून केला ; नंतर स्वतः हजर झाला पोलीस ठाण्यात !

 पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने भररस्त्यात गळा चिरून तिचा खून केला ; नंतर स्वतः हजर झाला पोलीस ठाण्यात !


पत्नीच्या कथित अनैतिक संबंधाला कंटाळून चिडलेल्या पतीने पुण्यातील हडपसर भागात भररस्त्यात पत्नीचा चाकूने गळा चिरला व तिचा खून करून स्वतःही आत्महत्येचा त्याने प्रयत्न केला , मात्र भावाने समजूत घातल्यानंतर तो पोलिसांपुढे हजर झाला . या धक्कादायक घटनेनंतर हडपसर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे . नितीन निकम ( वय 27 रा . चक्रपाणी वसाहत , भोसरी , मूळ गाव दहिगाव , ता . माळशिरस , जि . सोलापूर ) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे . मिळालेल्या माहितीनुसार , सहा वर्षापूर्वी नितीनचा विवाह झाला होता . त्यांना 4 वर्षांचा मुलगा आहे . नितीन भोसरीतील कंपनीत इलेक्ट्रिशियनचे काम करतो . तर पत्नी गृहिणी होती . तिची वर्तणूक चांगली नसल्याचा व तिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा त्याला संशय होता . त्यातून पती नितीन त्रस्त होता . पत्नीला अनेकवेळा समजावून सांगूनही ती ऐकत नव्हती . दरम्यान ती हडपसर भागात राहत असलेल्या आईकडे आली होती . तर नितीनचा भाऊ आजारी असल्याने तो पुण्यात उपचारासाठी आला होता . त्याच्यावर उपचार झाल्यानंतर आज त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले होते . यावेळी नितीन पत्नीला घेऊन जाण्यासाठी म्हणून आईकडे आला .

त्याने तिला घरी नेण्यासाठी प्रयत्न केले . पण तीने घराकडे येण्यास नकार दिला . मला मुलगा देखील नको , असे ती म्हणाली . यावेळी नितीनने तिला आपल्याला मुलाला मोठ्या भावाबरोबर गावाकडे पाठवायचे आहे . पण तो भावासोबत जात नाही . आपण त्याला सोडून येऊ असे सांगून बाहेर आणले . दुचाकीवर ते जात असताना बंटर स्कूलच्या पाठीमागे दुचाकी उभी करून लघुशंका करतो असे सांगून नितीन बाजूला गेला . तिला दुचाकी धरण्यास सांगितले . तिने दुचाकी धरल्यानंतर नितीनने पाठीमागून जाऊन तिचा चाकूने गळा चिरून खून केला .त्यानंतर त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . पण आत्महत्येपूर्वी त्याने भावाला फोन केला . तसेच मी पत्नीचा खून केला आहे . माझ्या मुलाला सांभाळ असे सांगितले . त्यावेळी भावाने त्याची समजूत काढली अन् आत्महत्या करण्यापासून रोखले . त्याला पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले . मग तो पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पत्नीच्या खूनाची माहिती दिली .

Post a Comment

0 Comments