मंगळवेढा-सांगोला उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी पकडला दहा लाख वीस हजार रुपयांचा गुटखा
मंगळवेढा प्रतिनिधी – येताळा खरबडे,दि.३ : मंगळवेढा येथे दहा लाख वीस हजार रुपयाचा गुटखा जप्त. मंगळवेढा – सांगोल्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास मंगळवेढा विजापूर रस्त्यावरील रिलायंस पेट्रोल पंपाजवळ टाटा झेनॉन एम एच 11-BL- 3358 या
वाहनातून सात लाख वीस हजार रुपयाचा आर.एम.डी. गुटखा तर तीन लाख रुपये चा सुगंधी पानमसाला असा दहा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.यावेळी संशयित आरोपी कडून सहा लाख रुपये किंमतीची टाटा झेनॉन गाडी ताब्यात घेतली आहे. याबाबत मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी आहे यामुळे महाराष्ट्रातील कथित गुन्हेगार कर्नाटकातून वेगवेगळ्या प्रकारचा बंदी असलेला गुटखा खरेदी करून महाराष्ट्रात आणून विकतात. मंगळवेढा हे महाराष्ट्र मध्ये असून कर्नाटक सीमेवर आहे.यामुळे कर्नाटकातून मोठ्या प्रमाणात गुटखा येतो.मंगळवेढ्याच्या उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांनी इचलकरंजी येथील संशयित आरोपी फजल सरदार मोमिन वय 30, अमोल आप्पासो शिंदे वय 38,इचलकरंजी राजेश पांडव इचलकरंजी यांच्याकडून हा गुटखा जप्त केला आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की फजल सरदार मोमीन व अमोल आप्पासो शिंदे यांनी टाटा झेनॉन गाडीतून हा कर्नाटकातून आर एम डी गुटखा व सुगंधी पानमसाला आणला त्यांची चौकशी केली असता इचलकरंजी येथील राजेश पांडव यांच्या सांगण्यावरून हा गुटखा आर एम डी व सुगंधी मसाला आणला असल्याचे त्यांनी सांगितले याबाबत मंगळवेढा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
0 Comments