google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दुपारी ४ च्या नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास कायदेशीर कारवाई करणार : तहसीलदार अभिजीत पाटील

Breaking News

दुपारी ४ च्या नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास कायदेशीर कारवाई करणार : तहसीलदार अभिजीत पाटील

 दुपारी ४ च्या नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास कायदेशीर कारवाई करणार : तहसीलदार अभिजीत पाटील


सांगोला / प्रतिनिधी : कोरोना संदर्भात मा जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ८ ते ४ या वेळेच्या पूर्वी व नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास , व कोरोना नियमांचे पालन न केल्यास आज पासून व्यापायांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिला आहे . काल शुक्रवार दिनांक १६ जुलै रोजी तहसीलदार अभिजीत पाटील यांनी सांगोला शहरातील दुपारी ४ नंतर सुरू असणाऱ्या व्यापाऱ्यांना व दुकानदारांना प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई केली जाईल अशा सक्त सूचना दिल्या आहेत . या प्रसंगी तलाठी व महसूल तसेच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . कोरोना या माहमरीमुळे अनेकांनी आपला जिव गमाविला आहे . आज ही अनेकजण जीवन मृत्यूशी झुंज देत आहेत .या विषाणु रोखण्यासाठी डॉक्टर , आरोग्य कर्मचारी , पोलिस , नगरपालिका , महसूल प्रशासन , राजकीय पदाधिकारी , पत्रकार , व्यापारी व नागरिकांनी सर्वांनी मिळून या पूर्वीच्या काळामध्ये चांगला लढा दिला आहे . हा लढा संपलेला नसून , तिसरी लाट समोर आहे . पुन्हा एकदा नव्याने रुग्ण संख्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे . यामुळे सदर चा लढा यापुढेही सुरूच ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत . यामध्ये मास्क , सोशल डिस्टन्स , सॅनिटायझर या सर्व गोष्टींचा वापर व नियम पाळणे बंधनकारक आहे . तसेच ही प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे . परंतु कर्तव्याचे पालन करताना काही व्यापाऱ्यांकडून याबाबत दक्षता घेतली जात नाही . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या वेळेच्या नंतर ही सांगोला शहरातील अनेक दुकाने व्यापारी उडून ठेवतात . यामुळे पुन्हा एकदा शहरांमध्ये व्यापाऱ्यांकडून नियमांची पायमल्ली होत असल्याने प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन व्हावे . तसेच आगामी विषाणू चे संकट वेळेतच रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे गरजेचे असून , मा . जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार ८ ते ४ या वेळेच्या पूर्वी व नंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडी ठेवल्यास , व कोरोना नियमांचे पालन न केल्यास आज पासून व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा तहसीलदार अभिजीत पाटील यांनी दिला आहे .

Post a Comment

0 Comments