google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Breaking News

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

 सांगोला ( प्रतिनिधी ) : - सांगोला येथील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रियेला दिनांक ३०/०६/२०२१ पासून सुरुवात झाली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री . बी . आर . गायकवाड व कॉलेजचे प्राचार्य डॉ . आर . ए . देशमुख यांनी दिली . प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेसाठी सुविधा केंद्र ( ६४७१ ) ला मान्यता मिळाली असून बुधवार ( दि . ३०/६/२०२१ ) पासून ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे , कागदपत्रे पडताळणी व अर्ज निश्चिती या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत . यावर्षी प्रथमच दहावीच्या निकालापूर्वीच प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे . विद्यार्थ्यांना फक्त दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक टाकून प्रवेश अर्ज भरता येणार आहे . या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना जन्म प्रमाणपत्र किंवा रहिवाशी दाखला आवश्यक आहे अशी माहिती प्राचार्य डॉ . आर ए देशमुख यांनी दिली . ही प्रक्रिया २३ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे . सांगोला , जत , मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालक यांच्यासाठी प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन , विद्यार्थी व पालकांचा होणारा संभ्रम , संबंधित कागदपत्रे जमविताना येणाऱ्या अडचणी व शंका याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला येथे सुविधा केंद्र असून याचा फायदा पालकांनी घ्यावा असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष श्री . बी . आर . गायकवाड यांनी केले . शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजचे हे १३ वे वर्ष असून कॉलेजने आपली उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून येथून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारे विद्यार्थी हे एक परिपूर्ण इंजिनियर किंवा व्यवसायिक होऊनच बाहेर पडतात . कॉलेजमध्ये असणाऱ्या उपलब्ध सुविधा , शिक्षणाचा दर्जा , शिस्त या गोष्टीमुळे पालकांची नेहमीच शिवाजी पॉलिटेक्निकला पसंती राहिली आहे . सन २०२१-२२ च्या प्रवेश प्रक्रियेसाठी शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मधील सुविधा केंद्रातील सर्व यंत्रणा सज्ज असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान प्राचार्य . डॉ . आर . ए . देशमुख यांनी केले .

Post a Comment

0 Comments