राजमाता महिला सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी सौ. अप्सरताई ठोकळे तर व्हा. चेअरमन पदी सौ. प्रियांका श्रीराम यांची निवड
सांगोला/प्रतिनिधी :सांगोला तालुक्यामध्ये महिलांच्या उन्नतीसाठी कर्ज पुरवठा करणाऱ्या राजमाता महिला सह. पतसंस्थेच्या चेअरमन पदी सांगोला नगरपरिषदेच्या बांधकाम सभापती सौ. अप्सराताई ठोकळे तर व्हा. चेअरमन पदी सौ. प्रियांका श्रीराम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर सभा सहाय्यक निबंधक अधिकारी एम. एल. शिंदे व अमर गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी राजमाता महिला सह. पतसंस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा तथा सांगोला नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. राणीताई माने, संचालिका नकुशा जानकर, संचालिका जानकी घाडगे, संचालिका राणी संजय माने, संचालिका कुशाला बिरुदेव माने, संचालिका श्रीमती भामाबाई जाधव, संचालिका कविता वाघ, संचालिका सिंधुबाई भोकरे, संचालिका अनुराधा व्हटे, संचालिका स्वप्नाली सादिगले, पतसंस्थेच्या सचिव सौ. मनीषा हुंडेकरी, क्लार्क पल्लवी कांबळे, जुलेखा इनामदार, लखन बनसोडे आदी उपस्थित होते.
0 Comments