google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 नंदेश्वर येथील चार नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना दिला आत्मदहनाचा इशारा

Breaking News

नंदेश्वर येथील चार नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना दिला आत्मदहनाचा इशारा

 नंदेश्वर येथील चार नागरिकांनी मुख्यमंत्र्यांना दिला आत्मदहनाचा इशारा


नंदेश्वर / प्रतिनिधी पिढयानपिढया विकासापासून वंचित असणाऱ्या मागास समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना चालू केली आहे . या योजनेअंतर्गत मौजे नंदेश्वर येथील चार मागासवर्गीय नागरिकांनी गेल्या तीन वर्षांपासून योग्य ती कागदपत्रांची पूर्तता केली असूनही , प्रशासनाने या लाभार्थ्यांची कुचेष्टा लावली आहे . त्यामुळे नंदेश्वर येथील सत्यवान कांबळे , हरी कसबे , लक्ष्मण कांबळे आणि बलभीम कांबळे या चार नागरिकांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला आहे . या चार लाभार्थी नागरिकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे जमीन मागणीचे प्रस्ताव दिनांक  २ ९ / ९ / २०१८ रोजी संबंधित कार्यालयाकडे दाखल केले . तसेच रड्डे , ता . मंगळवेढा येथील शेतकऱ्यांनी जमीन विक्रीचे प्रस्ताव दिनांक १ जानेवारी २०१ ९ रोजी संबंधित कार्यालयाकडे दाखल केले आहेत . सदरचे प्रस्ताव उपविभागीय समिती मंगळवेढा यांनी १५ जुलै २०१ ९ रोजी मंजूर करून जिल्हा समितीकडे सादर केले . तरी सदरची १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी करणार आत्मदहन जमीन खरेदी करून वाटपास विलंब होत असल्याने लाभाथ्यांनी २६ जानेवारी २०२० रोजीच्या प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा इशारा दिला होता . त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी सदर  लाभार्थ्यांना बोलावून घेऊन जमिनी खरेदी करून लवकरात लवकर वाटप करण्याचे आश्वासन दिले . व आत्मदहनाचे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता . सदर लाभार्थी यांनी जिल्हाधिकारी यांच्या विनंतीस मान देऊन आंदोलन माघारी घेतले होते . परंतु आजतागायत प्रशासनाच्या वतीने कसल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही .  त्यामुळे त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे . याशिवाय त्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे , विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र  फडणवीस , विधान परिषद विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर , पालकमंत्री दत्तात्रय भरणे ,  राज्यमंत्री ना . बच्चू कडू , आरपीआयचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे , आ . आमदार प्रशांत परिचारक , आ . समाधान  आवताडे , जिल्हाधिकारी , पोलीस अधिक्षक  सोलापुर , सहाय्यक आयुक्त सामाजिक न्याय  विभाग सोलापूर आणि आरपीआय मंगळवेढा  तालुकाध्यक्ष अशोक शिवशरण यांनाही आत्मदहनाचे निवेदन दिले आहे .

Post a Comment

0 Comments