google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 BIG BREAKING NEWS : पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर ! जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सभेत आज पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर

Breaking News

BIG BREAKING NEWS : पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर ! जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सभेत आज पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर

 BIG BREAKING NEWS : पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर ! जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन सभेत आज पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मंजूर


सोलापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन झालेल्या सर्वसाधारण सभेत आज ( गुरुवारी ) पंढरपूर स्वतंत्र जिल्हा करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे हे होते, सर्व सभा नियोजन बद्ध ऑनलाइन झाल्याने एकाही सदस्यांनी यावेळी विरोध केला नाही.सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाली. यापूर्वी 2 ऑनलाईन सभा सदस्यांनी गोंधळ घातल्याने तहकूब झाल्या होत्या, त्यानंतर सर्व पदाधिकारी सदस्यांनी यावर तोडगा म्हणून बुधवारी दोन सत्रांमध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात आढावा बैठक झाली.सांगोल्याचे एडवोकेट सचिन देशमुख यांनी सुरुवातीलाच स्वतंत्र पंढरपूर जिल्हा करण्याचा ठराव मांडला, यामध्ये पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या चार तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी त्यांनी केली. या ठरावाला ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख यांनी अनुमोदन दिले आणि हा ठराव एकमताने मंजूर झाल्याचं सचिन देशमुख यांनी सांगितलं. या सभेमध्ये गोंधळातच 26 विषयांना मंजुरी दिली.जि. प.सभापती अनील मोटे, ज्येष्ठ सदस्य वसंतराव देशमुख, भारत शिंदे, मदन दराडे, सुभाष माने, आनंद तानवडे, सभापती अनिल मोटे यांनी या सभेत आपले विषय मांडले. अरुण तोडकर, माळशिरसचे सदस्य त्रिभुवन धाईंजे हे या सभेला सुद्धा आक्रमक दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराम काका साठे व उमेश पाटील यांनी मात्र या ऑनलाईन सभेवर आपला बहिष्कार टाकला होता

Post a Comment

0 Comments