लग्नाचे आमिष दाखवून महिला पोलिसावर अत्याचार
सोलापूर , दि .२४ : लग्नाचे आमिष दाखवून एका महिला पोलिसावर अत्याचार केल्याप्रकरणी तिघाजणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . गणेश अर्जुन पाखरे ( रा . पेनूर , ता . मोहोळ ) , प्रियंका राजगुरू व व अशी आरोपींची नावे उमेश राजगुरू आहेत . फिर्यादी पीडित महिला पोलीस यांना संशयित आरोपी गणेशने लग्नाचे आमिष दाखविले . नंतर वेळोवेळी तुळजापूर , बार्शी रोड येथील विविध लॉजवर नेऊन शारीरिक संबंध ठेवले . तसेच गणेश याची बहीण प्रियंका राजगुरू व उमेश राजगुरू यांनी पीडितेला खोटे आश्वासन दिले . दरम्यान , पीडितेला गर्भपात करण्यास भाग पाडले , असे फिर्यादीत म्हटले आहे .


0 Comments