google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोल्यात भाजपच्या वतीने योग शिबिर संपन्न

Breaking News

सांगोल्यात भाजपच्या वतीने योग शिबिर संपन्न

सांगोल्यात भाजपच्या वतीने योग शिबिर संपन्न



सांगोला (तालुका प्रतिनिधी): जागतिक योग दिनानिमित्त सोमवार 21 जून रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात विविध ठिकाणी योग शिबिर संपन्न झाले. या योग शिबिरात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक सहभागी झाले होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. सोमवार 21 जून रोजी योग दिनानिमित्त भाजपकडून राज्यभरात योग शिबिरांचं आयोजन करण्यात आले. राज्यात सुमारे 2 हजार 700 पेक्षा जास्त ठिकाणी योग शिबिरांचं आयोजन करण्यात आले. सांगोला तालुक्यात भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी योग शिबिराचे आयोजन केले होते. या योग शिबिरात भाजप तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, जेष्ठ नेते  शिवाजीराव गायकवाड, योग प्रशिक्षक अविनाश कुलकर्णी, नरेश बाबर, प्रसाद फुले, वसंत सुपेकर, राजू शिंदे, संजय केदार, फय्याज शेख, सिद्धेश्वर शिंदे, दीपक केदार, अनिकेत शिंदे, बाळासाहेब चव्हाण, विनोद उबाळे, अवधूत केदार, रोहित सावंत, दत्तात्रय चव्हाण, रेवनसिध्द पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी योग प्रशिक्षक अविनाश कुलकर्णी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व पटवून दिले. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असून योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments