google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे एकाच रात्रीत दोन किराणा दुकानासह दवाखान्यात चोरी

Breaking News

सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे एकाच रात्रीत दोन किराणा दुकानासह दवाखान्यात चोरी

 सांगोला तालुक्यातील हलदहिवडी येथे एकाच रात्रीत दोन किराणा दुकानासह दवाखान्यात चोरी


सांगोला -अज्ञात तीन चोरट्यांनी एकाच रात्री दोन किराणा दुकानासह एक दवाखाना फोडून ड्राव्हर गल्ल्यात ठेवलेले रोख ७३ हजार रुपयेसह किराणा माल चोरून नेला तर दोन किराणा दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ही घटना काल गुरुवार पहाटे ३ च्या सुमारास हलदहिवडी ता. सांगोला येथील ग्रामपंचायत समोरील  मुख्य चौकात घडली आहे. या घटनांमुळे गावात भितीचे वातावरण पसरले आहे.हलदहिवडी येथील विष्णू प्रभाकर गायकवाड यांनी बुधवार रात्री ९ च्या सुमारास त्यांचे पृथ्वीराज किराणा दुकान बंद करून शेजारी स्वतःच्या घरात झोपले होते. दरम्यान गायकवाड कुटुंब झोपेत असताना त्यांच्या दुकानामध्ये कशाचा तरी आवाज येऊ लागल्याने सर्वजण झोपेतून उठले त्यावेळी दुकानाच्या आतमध्ये अंदाजे वय २१ ते २५ असलेले व तोंडाला रुमाल बांधलेले तीन इसम त्यांना दिसून आले म्हणून त्यांनी तुम्ही कोण आहात अशी विचारणा केली असता चोरट्यांनी काहीएक न बोलता दुकानामधून धूम ठोकली.विष्णू गायकवाड यांनी घराच्या दरवाजातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली होती म्हणून त्यांनी दरवाजा जोराने ओढल्याने कडी निघाली . चोरट्यांनी किराणा दुकानाच्या लोखंडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला व ड्रावहरमधील गेल्या तीन-चार दिवसापासून विक्रीतून आलेले रोख ३५ हजार रुपये चोरून नेले. चोरट्यांनी गावातील डॉ. दास यांचा शिवकृपा दवाखाना येथून रोख २० ते २१ हजार रुपये तर उमेश पाटील यांच्या ज्योतिर्लिंग किराणा स्टोअर्सचे शटर कटाऊनने उचकटून आत प्रवेश करीत ड्राव्हरमधून रोख १५  ते १७ हजार रुपयेसह खोबरे संतूर साबण आदि किराणा माल चोरला तेथून चोरट्यांनी रामलिंग पवार यांच्या अजित किराणा स्टोअर्स दुकानासमोरील शेडमधील एलईडी बल्ब चोरूले व वसंत खजिने यांचे सचिन किराणा स्टोअर्सचे शटर उचकटून चोरी करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब झोळ यांनी सुरू झालेल्या या ठिकाणास भेटी देऊन पंचनामा केला आहे. याबाबत  ,विष्णू प्रभाकर गायकवाड रा. हलदहिवडी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments