सांगोला महूद रस्त्यावरील चिंचोली तलावानजीक असणारा पुलावर मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत होते .
सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : सांगोला महूद रस्त्यावरील चिंचोली तलावानजीक असणारा पुलावर मोठे खड्डे पडल्याने वारंवार अपघात होत होते . त्यामुळे संबंधित विभागाने या पुलाच्या दुरुस्ती करण्याबाबत शुक्रवारी । दै.दामाजी एक्सप्रेसच्या अंकात बातमी प्रसिद्ध । केली होती . या बातमीची दखल घेऊन । शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे भरून घेतले . त्यामुळे वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे . . सांगोला - महूद रस्त्यावरील चिंचोली तलावानजीक असलेल्या पुलांवरील संरक्षक - कठडे व रेलिंग गायब आहेत . तसेच पुलावरील रस्तेही खराब झाल्याने अशा पुलांवरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे . पुलावर | मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसाचे पाणी खड्ड्यात साचून राहिले असल्याने दुचाकीस्वार , चारचाकी वाहन धारकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने दररोज अनेक अपघात होत आहेत . पुलांवरील तुटलेली व गायब झालेली रेलिंग बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे . वाहनांच्या सातत्याने असणाऱ्या वर्दळीमुळे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले होते . त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती .
लवकरात लवकर सदरचा पूल दुरुस्त करण्याची मागणी वाहनचालक , प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे . याबाबत शुक्रवारी दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या अंकात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती . या बातमीची तातडीने दखल घेऊन काल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेत पुलावरील खड्डे मुजवण्याचे काम हाती घेतले . वाहनधारकांची चांगली सोय झाली आहे . त्यामुळे त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे .



0 Comments