सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी यापुढे तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी आंदोलने करावी लागणार नसल्याचे विधान नुकतेच केले .
सांगोला , ता . २४ सांगोला म्हटलं की ' दुष्काळ ' हा शब्द जोडला जातोच . येथील कमी पर्जन्यामुळे सर्वसामान्यांना पिण्याचा व शेताच्या पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावतो . पाणी प्रश्नावरच येथील राजकारण फिरले व फिरविले जाते . पाण्यासाठीच तालुक्यात आजपर्यंत अनेक आंदोलने , संघर्ष यात्रा व पाणी परिषदा घेतल्या गेल्या . सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी यापुढे तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी आंदोलने करावी लागणार नसल्याचे विधान नुकतेच केले . त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यातील अपूर्ण पाण्याची योजना पूर्ण होणार का , सांगोल्यातील जनतेचा पाण्यासाठीचा संघर्ष आता तरी थांबणार का , असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित होत आहे . सांगोला तालुक्यातील कोणतीही निवडणूक असली तरी इतर प्रलापेक्षा ती पाणी प्रश्नावरच जास्त गाजते . निवडणुकीत पाणी योजनांवाच राजकीय उणे - धुणे काढले जाते . नुकतेच टेभू योजनेचे सोडलेले पाणी मेथवडे येथे पोहोचल्यानंतर पाणी पूजन करण्यात आले . यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी यापुढे आंदोलने , संघर्ष करावा लागणार नसल्याचे सांगितले होते . टेंभ , म्हैसाळ योजना , नीरा उजवा कालवा इत्यादी योजनेतील पाणी पुरेशा प्रमाणात आणि वेळेत देण्यासाठी प्रयत्न केल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी सांगितले . मान नदीवरील सर्व बंधारे भरून काढले असून चिंचोली येथील तलावात लवकरच पाणी सोडण्यात येणार आहे . बुद्धेहाळ तलावात पाणी सोडण्यात आले आहे .पारे , जवळा येथील छोटी - मोठी तलाव भरून घेतली आहेत . राजेवाडी तलावाचे आतापर्यंत तीन वेळा पाणी मिळाले आहे . सर्व योजनांतील उन्हाळी आवर्तने पुरेशा प्रमाणात देण्यासाठी प्रयत्न केले . पावसाळी पाण्याचे नियोजन केले असून यापुढेही कायमस्वरूपी पाणी पुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले . अतिवृष्टीमुळे तुटलेल्या बंधान्यांचे कामांसाठी दुरुस्तीसाठी निधी उपलव्य केला आहे . तालुक्यातील विविध बंधाऱ्यावर बॅरिगेट्स ( दारे ) ही बसवण्यात येणार आहेत . त्यामुळे पाणी साठवण्यास मोठी मदत होणार आहे . निसर्गाची किमया असो वा राजकीय नियोजन जनतेचा पाणी संघर्ष सध्यातरी थांबला असून यावर्षी तरी तालुक्यातील जनतेला पाणी मिळाले आहे .


0 Comments