Breaking News

ओबीसी आरक्षणासंदर्भात महात्मा फुले समता परिषद व माळी महासंघ , ओबीसी समाज यांच्यावतीने मिरज -सांगोला रोड वर रास्ता रोको आंदोलन .

 स्थानिक स्वराज्य संस्थामधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवणेसाठी मिरज- सांगोला रोड ( रेल्वे फाटक ) जवळ सोमवार दिनांक- २८/०६/२०२१ रोजी सकाळी वाजता रास्ता रोको आंदोलन करणार 


 सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशन मध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायत राज संस्थामधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे याचा फार मोठा परिणाम होत आहे . संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद , नगरपंचायत , नगरपालिका व महानगरपालिका मधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर यांचा परिणाम होत आहे . त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे . मंडल आयोग व ७३ आणि ७४ व्या घटना दुरुस्तीने ओ.बी.सी.ना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे . त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे . ओबीसी प्रवर्गातील वंचित जनसमुहांना लोकशाही प्रक्रियेत पंचायत राज संस्थामध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे . सध्या उध्दभवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने त्वरीत उचित कार्यवाही करुन , ओबीसींच्या हक्काच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे . या कारणासाठी दिनांक २८/०६/२०२१ रोजी सांगोला येथे मिरज - सांगोला रोड ( रेल्वे फाटक ) जवळ तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी . उपस्थितीत शहर अध्यक्ष श्री भैरवनाथ बुरांडे  तालुका संघटक श्री बबन नलवडे जिल्हा उपाध्यक्ष श्री संतोष गवळी तालुका अध्यक्ष श्री मधुकर माळी 

Post a Comment

0 Comments