google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा वर्षभरापासून टाळेबंद गावविकासावर परिणाम : भ्रष्टाचारासाठी मोकळी वाट

Breaking News

ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा वर्षभरापासून टाळेबंद गावविकासावर परिणाम : भ्रष्टाचारासाठी मोकळी वाट

राज्यात कोरोनाची लाट येताच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा स्थगित करण्यात येत असल्याचे आदेश १२ मे २०२० रोजी ग्रामविकास विभागाने काढले होते . सध्या कोरोनाचा कहर वाढत असल्याने अद्यापही ग्रामसभा घेण्यासाठी परवानगी आली नाही .

परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा वर्षभरापासून न असल्याने गावाच्या विकासाचा वेग मंदावला आहे . अनेक योजनांच्या लाभार्थ्यांची निवड खोळंबली आहे . आराखडा मंजूर होऊन पडला आहे . शासन निर्णयानुसार आर्थिक वर्षांत किमान चार ग्रामसभा घेणे आवश्यक आहे . कोरोना साथीमुळे आर्थिक वर्ष संपले तरी एकही ग्रामसभा होऊ शकली नाही . त्यामुळे ग्रामपंचायतीमार्फत करण्यात येणाऱ्या विकासकामांना खीळ बसली आहे . लाभार्थी निवड खोळंबली आहे . १ मे रोजीच्या ग्रामसभेत प्रशासनाकडून अहवाल वाचन होते याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांच्या लाभार्थ्यांची निवड केली जाते . एकही ग्रामसभा होऊ न शकल्याने प्रधानमंत्री आवास योजना , रमाई आवास योजनचे लाभार्थी निवडता आले नाही . १५ आगस्ट च्या ग्रामसभेत मंजूर केला जातो . पण एकही ग्रामसभा झालीच नाही . योजनेतून गावात कुठे - कुठे विकास कामे करायची यावर चर्चा होऊ शकली नाही . पंचायत करायची यावर चर्चा होऊ शकली नाही . पंचायत समितीत्याकडे प्रस्तावित कामाचा आराखडा सादर करायचा असल्याने सदस्यांच्या मासिक बैठकीत तो मंजूर करण्यात आला आहे .

Post a Comment

0 Comments