सांगोला (तालुका प्रतिनिधी): राज्यातील आघाडी सरकार हे आघाडी नसून बिघाडी सरकार आहे. जनतेच्या प्रश्नावर हे सरकार दूर पळत आहे. मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर या सरकारला न्यायालयात आपली बाजू मांडण्यास अपयश आले आहे. आघाडी सरकारने मराठा समाजावर अन्याय केल्यानंतर आता ओबीसी समाजावर देखील या सरकारने अन्याय केला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित राहावे, ही भाजपची मागणी आहे. आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केला आहे.ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज संस्थामध्ये राजकीय आरक्षण कायम ठेवण्यासाठी भाजपच्या वतीने मिरज-पंढरपूर रोडवरील जुनोनी ता.सांगोला येथे 26 जून रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत म्हणाले, सध्याचे राज्यातील महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजाचे प्रश्न व हक्क याबाबत पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. वारंवार केलेल्या विनंत्या, निवेदने यावर तोंडी आश्वासने देऊन आवश्यक ती पावले मात्र उचलली जाताना दिसत नाहीत. नाईलाजास्तव ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन करावे लागत आहे. आघाडी सरकारने मराठा समाजाचा घात केला आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण मराठा समाजाच्या आरक्षणाप्रमाणे गंभीर आहे. ओबीसी समाजाची आघाडी सरकारने फसवणूक केली आहे. या सरकारच्या नाकर्तेपणामुळे व असंख्य चुकांमुळे ओबीसी समाजाने स्थानिक स्वराज संस्थामधील राजकीय आरक्षण गमावले. ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. यापुढील काळात ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी आलदर, मागासवर्गीय मोर्चाचे तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष दुर्वा हिप्परकर, शिवाजीराव गायकवाड, एन.वाय.भोसले, अभिमन्यू पवार, माणिक सकट, संजय केदार, राहुल मंडले, विलास होनमाने, राहुल होनमाने, दिलीप कोळेकर, संभाजी गोडसे, बाळासाहेब कोळेकर, अमोल मोहिते, कुंडलिक आलदर, काका पांढरे, महादेव सरगर, हरी पांढरे, अशोक आलदर,दीपक केदार,राजू शिंदे, बिरा आलदर, उमेश मंडले, सुरेश आलदर, किरण पांढरे, निलेश मदने, प्रकाश हांडे, आण्णा इमडे, तानाजी मदने, शामराव मदने, विष्णू सरगर, भीमराव आलदर, मदन आलदर, बापू आलदर, विजय आलदर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपच्या वतीने पोलीस निरीक्षक सुहास जगताप, महसूल विभागास निवेदन देण्यात आले. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सपोनि प्रशांत हुले यांनी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. रास्ता रोको आंदोलनामुळे मिरज-पंढरपूर मार्गावरील वाहतूक बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


0 Comments