google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अवैध धंद्याच्या माध्यमातून शहरात वाढत असणाऱ्या गुंड प्रवुत्तीला पोलीस प्रशासनाने वेळीच आळा घालावा नाहीतर शिवसेनेतर्फे प्रचंड आंदोलनाचा इशारा

Breaking News

अवैध धंद्याच्या माध्यमातून शहरात वाढत असणाऱ्या गुंड प्रवुत्तीला पोलीस प्रशासनाने वेळीच आळा घालावा नाहीतर शिवसेनेतर्फे प्रचंड आंदोलनाचा इशारा

 अवैध धंद्याच्या माध्यमातून शहरात वाढत असणाऱ्या गुंड प्रवुत्तीला पोलीस प्रशासनाने वेळीच आळा घालावा नाहीतर शिवसेनेतर्फे प्रचंड आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर प्रतिनिधी:आज रविवार दि.२० जून २०२१ रोजी सकाळी १०: ३० वाजेच्या सुमारास किरकोळ वादातून किंवा सोनसाखळी चोरण्याच्या प्रकारातून एका निष्पाप नागरीकारावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी करीत पुन्हा प्रवर्तन चौकात दहशत माजविण्याच्या प्रकार चौघ गुंडांनी केल्याचे दिसून येत आहे. सदरील २ गुंड भुसावळ व २ बुऱ्हानपूर येथील असल्याचे समजते . तर मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश च्या सिमारेषेवर असल्याने सदरील गुंडांचा अवैध धंदे व इतर गुन्हेगारी प्रकारासाठी सद्या मुक्ताईनगर शहरात व तालुक्यात वावर वाढलेला आहे अशी ओरड गेल्या काही दिवसांपासून होत आहे.आजची घटना हि धक्कादायक असून मुक्ताईनगर शहरात गुन्हेगारी क्षेत्राचे पाळेमुळे वाढण्याचा संकेत यामुळे दिसून येत असून सदरील प्रकारावर वेळीच आळा घालण्यात यावा. व शहरात किंवा तालुक्यात बाहेरून येणारी गुन्हेगारी व येथे खतपाणी घालण्याचा घाणेरडा प्रकार होत असेल तर पोलीस प्रशासनाने तात्काळ योग्य त्या उपाय योजना कराव्यात व सदरील मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा शिवसेनेतर्फे प्रचंड आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदन शिवसेनेचे तालुकाप्रमुख छोटू भोई, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान,गटनेते राजू हिवराळे,शहर प्रमुख गणेश टोंगे, युवासेना जिल्हाउपधिकारी पवन सोनवणे, जाफर अली, शकील भाई,नगरसेवक बबलू कोळी,गट नेता पियुष महाजन,पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे,संतोष माळी, शुभम शर्मा, प्रमोद भारंबे आदी शिवसैनिकांमार्फत  मुक्ताईनगर तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.

Post a Comment

0 Comments