google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सीबीआय अधिका-यांना ड्युटीवर जीन्स, टी-शर्ट बंदी

Breaking News

सीबीआय अधिका-यांना ड्युटीवर जीन्स, टी-शर्ट बंदी

 सीबीआय अधिकाऱ्यांना आता ड्युटीवर असतांना जीन्स, टी-शर्ट आणि स्पोटर्स शूज वापरण्यास मनाई करण्यात येणार आहे. सीबीआयचे नवनिर्वाचित संचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी आपल्या विभागातील अधिका-यांसह कर्मचाऱ्यांच्या गणवेशाच्या नियमावलीत परिवर्तन केले आहेत.


अधिकारी व कर्मचारी वर्गाला ड्युटीवर येतांना फॉर्मल कपडे परिधान करावे लागणार आहेत. यापुढे कार्यालयात जीन्स, टी-शर्ट आणि स्पोर्ट्स शूज चालणार नसल्याचे आदेश सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिले आहेत.याशिवाय अधिकाऱ्यांना दाढी देखील वाढवता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला ड्युटीवर असतांना केवळ साडी अथवा फॉर्मल शर्ट परिधान करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय अजून काही बदल करण्याची तयारी सुबोधकुमार जायस्वाल यांनी सुरु केली आहे.

Post a Comment

0 Comments