धक्कादायक! व्यवसाय चालत नाही, लग्न जमत नसल्याने मंगळवेढ्यातील तरुणाची दुकानामध्ये गळफास घेऊन आत्महत्या
मंगळवेढा तालुक्यातील निंबोणी येथील पंचवीस वर्षीय तरूणाने व्यवसाय चालत नसल्याने आणि लग्न जमत नसल्याने स्वतःच्या दुकानांमध्ये दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.दिगंबर बाळू घोगरे असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत साऊबाई बाळू घोगरे यांनी पोलिसात खबर दिली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी कि, दिगंबर घोगरे याचा गावामध्ये आदित्य अल्युमिनियम व ग्लास वर्क व्यवसायाचे दुकान आहे. दुकानाच्या पत्र्याच्या खालील अंगलला त्याने गळफास घेतला.नातेवाईकांना समजताच घोगरे तत्काळ ग्रामीण आहे. याबाबत उपचारासाठी आणले. त्याला तपासले असता तो मयत झाला. अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.


0 Comments