वैज्ञानिकांचं भलतंच संशोधन , आता पुरुषही देऊ शकणार बाळाला जन्म
नवनवीन प्रयोग करून अनेक शोध लावण्यात आले आहेत . अनेक देशातील वैज्ञानिक संशोधन करत असतात . महिला बाळाला जन्म देतात . मात्र आता पुरुषही बाळाला जन्म देऊ शकणार आहेत . चिनी वैज्ञानिक अनेकदा काहीतरी विचित्र संशोधन ( Weird Experiment ) किंवा प्रयोग करत असतात . अलीकडेच चीनच्या वुहान लॅबमधील ( Wuhan Lab ) एका वैज्ञानिकानी असा दावा केला होता , की चीन विचित्र संशोधन करत राहतं . तिथे अशी बरीच संशोधनं केली जातात ज्यावर सामान्यत : इतर देशांमध्ये बंदी आहे . यामध्ये आता चिनी शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे , की त्यांनी पुरुषांना गर्भवती करण्याचा चमत्कार केला आहे . यासाठी ते बऱ्याच वर्षांपासून संशोधन करत होते . आता या संशोधनाचा निकाल समोर आला आहे . चीनमधील वैज्ञानिकांनी केलेल्या या संशोधनात नर उंदरांच्या शरीरावर प्रयोग करण्यात आले . यात शस्त्रक्रियेद्वारे मादीच्या शरीरातून काढलेले गर्भाशय नराच्या शरीरात फिट केलं गेलं . यानंतर , नर गरोदर राहिला आणि मुलांचा जन्म सिझेरियनच्या माध्यमातून झाला . या संशोधनानंतर आता भविष्यात पुरुषांचं गरोदर राहाण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे . इन्फोव्हर्सच्या अहवालानुसार या संशोधनानंतर आता ज्या ट्रान्सजेंडर्सना मुलांना जन्म देण्याची इच्छा आहे , त्यांना मदत मिळेल . हा प्रयोग शांघायच्या ( Shanghai ) नेव्हल मेडिकल युनिव्हर्सिटीने केला आहे . यात संशोधकांनी आधी मादी उंदरांच्या शरीरातून गर्भाशय बाहेर काढले . यानंतर , ते एका नर उंदराच्या शरीरात फिट केले . या गर्भाशयाच्याप्रत्यारोपणानंतर तो नर उंदीर गरोदर राहिला आणि सिझेरियनच्या माध्यमातून डिलिव्हरी केली गेली . हे संशोधन चार टप्यात पूर्ण केलं गेलं . याला रॅट मॉडेल ( Rat Model ) असे म्हणतात . मात्र , सध्या याचा सक्सेस रेट फक्त 3.68 टक्के असल्याचं नोंदविण्यात आलं आहे . नर उदरांवर हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यानं 10 मुलांना जन्म दिला आहे . चीनमधील संशोधक आता मानवांवर रॅट मॉडेल अवलंबण्याचा विचार करीत आहेत . प्रयोगात पुरुषाला गरोदर करण्याची ही पहिलीच वेळ आहे . सस्तन प्राण्यावर झालेल्या या प्रयोगाने आता मानवांमध्येही त्याच्या यशाची आशा वाढली आहे . यापूर्वी NYU स्कूल ऑफ मेडिसिननेदेखील ट्रान्सजेंडर्ससाठीही असाच प्रयोग केला होता .


0 Comments