google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मटणाच्या पार्टीत जेवण दिले नाही म्हणून मित्रानेच केले मित्राच्या गळ्यावर चाकूने वार ; सोलापूर जिल्ह्यातील घटना

Breaking News

मटणाच्या पार्टीत जेवण दिले नाही म्हणून मित्रानेच केले मित्राच्या गळ्यावर चाकूने वार ; सोलापूर जिल्ह्यातील घटना

 मटणाच्या पार्टीत जेवण दिले नाही म्हणून मित्रानेच केले मित्राच्या गळ्यावर चाकूने वार ; सोलापूर जिल्ह्यातील घटना


पंढरपूर : पंढरपूर येथील स्मशानभूमी शेजारील हॉलमध्ये तीन मित्रांची मटणाची पार्टी सुरु होती . या पार्टीदरम्यान अचानक आलेल्या इतर दोघांना जेवायला न दिल्यामुळे त्यांनी मित्राच्या गळ्यावर चाकूने वार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली आहे .पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार , समाधान सुरेश गायकवाड ( वय २ ९ , रा . संतपेठ , महात्माफुले चौक , पंढरपुर ) , भारत व बाळा हे तिघेजण स्मशानभूमी शेजारील हॉलमध्ये मटणाची पार्टी करत होती .यावेळी त्या ठिकाणी दादा कदम व किशोर दिलीप बंदपट्टे ( दोघे रा . पंढरपुर ) हे दोघे आले . आम्हाला जेवण द्या म्हणून मारहाण करू लागले.या दरम्यान दादा कदम याने समाधान गायकवाड यांच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार केला . तर किशोर बंदपट्टे यांनी लाकडाने मारहाण केली .यामुळे सपोनि कपिल सोनकांबळे यांनी दादा कदम व किशोर दिलीप बंदपट्टे यांना ताब्यात घेतले . त्या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले . यावेळी न्यायाधीशांनी त्या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments