google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ताईच्या बाळंतपणासाठी गेलेल्या 21 वर्षीय बहिणीवर बलात्कार, भावजींवर गुन्हा

Breaking News

ताईच्या बाळंतपणासाठी गेलेल्या 21 वर्षीय बहिणीवर बलात्कार, भावजींवर गुन्हा

 ताईच्या बाळंतपणासाठी गेलेल्या 21 वर्षीय बहिणीवर बलात्कार, भावजींवर गुन्हा 


जयपूर, दि.२७ जून: बहिणीच्या बाळंतपणासाठी तिच्या घरी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये उघडकीस आली आहे. पीडित मेव्हणीच्या तक्रारीनंतर भावजींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चहामध्ये गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केल्यानंतर भावजींनी आपल्यावर अत्याचार केला, असा आरोप पीडितेने केला आहे.बाळंतपणानंतर मदतीसाठी बोलावलं राजस्थानमधील भरतपूरमध्ये ही घटना घडली. पीडितेच्या मोठ्या बहिणीची नुकतीच डिलीव्हरी झाली होती. बाळंतपणामुळे घरातील कामं करण्यासाठी आणि मदतीसाठी तिने धाकट्या बहिणीला आपल्या घरी राहायला बोलावले. मात्र तिच्या मेव्हण्याची वाईट नजर तिच्यावर पडली. चहातून गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करुन भावजींनी आपला बलात्कार केला, अस आरोपी तिने केला आहे.भावजींकडून बलात्कार, बहिणीचीही साथ शुद्धीवर आल्यानंतर तिने घडलेला प्रकार आपल्या नातेवाईकांना सांगितला. धक्कादायक म्हणजे ताईनेही भावजींची साथ दिल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Post a Comment

0 Comments