google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या

Breaking News

झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या

 झोपलेल्या दाम्पत्याची डोक्यात फावडे घालून निर्घृण हत्या


 शिर्डी जवळील को-हाळे शिवारात चांगलेमळा येथील दांम्पत्याच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली. रात्रीच्या सुमारास दांम्पत्य गाढ झोपेत असताना फावडे डोक्यात घालून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. शशिकांत चांगले ( वय 55 ) आणि सिंधू चांगले ( वय 50 ) असे हत्या झालेल्या पती – पत्नीच नाव आहे.शशिकांत आणि सिंधु चांगले हे दाम्पत्य आपल्या शेतावरील घरात दोघेच राहात होते. त्यांची मुले राहाता येथे वास्तव्यास आहेत. उकाडयामुळे घराचा एक दरवाजा उघडा ठेवून हे दांम्पत्य झोपले होते. रात्रीच्या सुमारास दोघेही गाढ झोपेत असताना त्यांची फावडे डोक्यात घालून हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालय.घरात कसलीही चोरी झाली नसल्याने यामागे हत्येचाच इरादा होता हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. दरम्यान श्वानपथक , फॉरेन्सिक टिमला बोलवण्यात आले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.घटनेची माहीती मिळताच‌ राहाता पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक सुभाष भोये हे आपल्या फौजफाटयासह घटनास्थळी पोहोचले. घटनेचा पंचनामा करत आरोपींच्या शोधार्थ पोलिसांनी श्वानपथकाद्वारे माग काढण्याचा‌ प्रयत्न केला. घटना स्थळापासुन एक किलोमीटर अंतरापर्यंत श्वानाने ‌माग शोधला मात्र तो तेथुन पुन्हा घटनास्थळी पोहोचला. फॉरेंन्सिक टिमने पुरावे शोधले आहेत. मात्र पोलिसांनी ते उघड केलेले नाहीत. दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. लवकरच आरोपी जेरबंद होईल असा विश्वास अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांनी प्रसामाध्यमांना सांगितले.अतिरिक्त पोलिस अधीक्षक दिपाली काळे , शिर्डीचे विभागीय पोलिस अधिकारी सावंत , पो.नि सुभाष भोये हे घटनेचा तपास करत असुन हि घटना पुर्व वैमन्यासातुन की जमिनीच्या वादातुन घडली याचा तपास करत आहेत. या घटनेची वार्ता गावात कळताच ग्रामस्थांनी चांगले यांच्या मळ्यात‌ मोठी गर्दी केली होती. या हत्येचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी को-हाळे ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments