निर्भीड पत्रकार चाँदभैय्या शेख यांची पत्रकारिता क्षेत्रात भरारी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड
महाराष्ट्रातील सर्व पत्रकार व सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी अतिशय कडवी झुंज देत असलेल्या माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण आणि पोलिस मित्र फौंडेशन संचालित माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या *महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष पदी* सोलापूर जिल्ह्यातील निर्भीड पत्रकार व सांगोला तालुक्याचे सुपुत्र चाँदभैय्या बाबालाल शेख यांची पदोन्नती निवड करण्यात आले आहे .चाँदभैय्या शेख हे चळवळीतील कार्यकर्ते, निर्भीड, पत्रकार, मनमिळाऊ स्वभावचे असल्याने त्यांचा दांडगा संपर्क आहे. पत्रकारांचे अडीअडचणी ,घर यासह अनेक प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी पत्रकारांची एकजूट करून त्यांना न्याय देण्यासाठी सतत काम करीत आले आहेत .ग्रामीण भागातील पत्रकारांचे भेडसावणाऱ्या समस्या जनसामान्यांचे न्यायीक विषय सरकार दरबारी मांडणे हे त्यांचे कार्य पाहून नियुक्ती करण्यात आली आहे विशेषतः.राज्यात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा विषयांचे बातमीपत्र गाजले आहेत. ते सीबीएस न्युज मराठी चे मुख्य संपादक आहेत .आणि त्यांच्या निर्भीड बातम्यांची दखल शासन दरबारी कायम घेतली जात आहे .विशेषतः माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समिती मध्ये प्रथम पश्र्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष नंतर महाराष्ट्र राज्य समन्वयक म्हणून यशस्वीपणे काम केले आहे .आणि आता राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे व राष्ट्रीय महासचिव यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष महेश सारणीकर व राज्य महासचिव इद्रीश सिद्दीकी यांनी चाँदभैय्या शेख यांची *महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी* नियुक्ती केली आहे .दरम्यान प्रदेशाध्यक्ष महेश सारणीकर म्हणाले की सर्वसामान्य लोकांच्या कल्याणकारी कामकाजासाठी आणि संघटनेच्या वाढीसाठी तसेच माहिती अधिकार पत्रकार समितीचे ध्येय धोरणे आणि कार्य करण्यासाठी चाँदभैय्या शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीपत्रामध्ये संघटनेचे ध्येय धोरणाच्या आधिन राहुन आपल्या कार्यक्षेत्रात संघटना मजबुत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न कराल ही अपेक्षा ! व्यक्त करीत शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
0 Comments