सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत . जिल्ह्यात 132 म्युकर मायकोसिस रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे . सध्या 120 रुग्ण उपचार घेत असून 30 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत .
यामध्ये चार रूग्ण कोविड असून बाकीचे नॉनकोव्हिड आहेत . यामुळे नागरिकांनी कोरोना झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज आहे . या रुग्णांकरिता ' महात्मा फुले जनआरोग्य ' योजनेतून उपचार घेता येणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे . रुग्णांना अम्फोटिसिरीन - बी इंजेक्शनची कमतरता पडू देऊ नका .इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत योग्य नियोजन करा . ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी पोलिस यंत्रणेने पेट्रोलिंग , कारवाया वाढविल्या पाहिजेत . पोलिसांना साखर कारखाने , बाजार समित्या यांची वाहने उपलब्ध करून द्याव्यात . उपप्रादेशिक परिवहन विभागाने अतिरिक्त माल भरणारी जड वाहतूक तपासणीसाठी नाके वाढवावेत . वाढीव बिलांच्या अजूनही नागरिकांच्या तक्रारी येत असून डॉक्टरांनी सामाजिक जाणिवेतून काम करावे . नातेवाईकांनी डॉक्टरांकडून पक्के बिल घ्यावे . रुग्णालयांनी शासकीय दरपत्रक सक्तीने लाऊन घ्यावे . सलमान खान यांच्या बिईंग ह्युमन संस्थेने 25 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिली असून जिल्ह्यातील आणि बाहेरील सामाजिक संस्था , उद्योग यांच्याकडून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळविण्याचा प्रयत्न करा . या योजनेच्या रुग्णालयांची बैठक घेऊन त्यांच्या शंका दूर कराव्यात अशा सचना भरणे यांनी केल्या


0 Comments