google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल : काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

Breaking News

१ जूननंतर लॉकडाऊन शिथिल : काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?

 १ जूननंतर लॉकडाऊन शिथिल : काय आहे ठाकरे सरकारचा प्लॅन?


मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने आता सरकार लॉकडाऊन कधी उठवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, त्यासाठी राज्यातील लॉकडाऊन एका झटक्यात न उठवता चार टप्प्यात त्याची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे सरकार १ जूनपासून लॉकडाऊन उठवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करेल. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात दुकाने उघडली जातील. गेल्या काही दिवसांत दुकाने बंद असल्यामुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिणामी पहिल्या टप्प्यात हे सर्व व्यवहार सुरु करण्यावर सरकार भर देईल. तर तिसऱ्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंटस, बार आणि मद्यविक्रीची दुकाने सुरु करण्यात येतील. त्यानंतर चौथ्या टप्प्यात सरकारकडून लोकल सेवा आणि धार्मिक स्थळे सुरु केली जातील. याच काळात जिल्हाबंदी कधी उठवायची याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल.

Post a Comment

0 Comments