google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला पोलिसांना दमदाटी करून तिघांनी वाळूसह ट्रॅक्टर पळवून नेला

Breaking News

सांगोला पोलिसांना दमदाटी करून तिघांनी वाळूसह ट्रॅक्टर पळवून नेला

 पोलिसांना   दमदाटी करून तिघांनी वाळूसह ट्रॅक्टर पळवून नेला  पोलीस नाईक प्रमोद मोरे व पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव हे नाझरा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक प्रमोद मोरे व पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव हे नाझरा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना


अजनाळे ते बोंबेवाडी रोडवर एक ट्रॅक्टर अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली . त्यानुसार अजनाळे ते बोंबेवाडी रोडवरील प्राथमिक शाळेजवळ पोलीस थांबले असता समोरुन वाळू घेऊन ट्रॅक्टर येत असल्याचे दिसून आले . त्यांनी चालकास ट्रॅक्टर थांबविण्यास सांगून जवळ जाऊन पाहिले असता ट्रॅक्टरमध्ये वाळू मिळून आली . ट्रॅक्टर चालकाकडे चौकशी केली असता त्यांनी वाळूची रॉयल्टी नसल्याचे सांगितले . त्यावेळी तिघांनी दुचाकीवरून त्या ठिकाणी येऊन पोलिसांना तुम्हाला काय करायचे ते करा , तुम्ही आमचा ट्रॅक्टर कसा काय अडवला असे म्हणून दमदाटी करून पकडलेला ट्रॅक्टर सुरूकरुन बोंबेवाडीकडे पळवून नेला . ९ यावरून पोलीस कॉन्स्टेबल कुमार जाधव यांनी फिर्याद दिली आहे . पोलिसांनी सुमित बाळासोा कदम , रमेश जाधव , विकास रामचंद्र विभुते , दादा रामचंद्र विभुतेसह एक अनोळखी इसम अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे

Post a Comment

0 Comments