google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मायक्रो फायनान्सकडून महिला बचतगटांची होणारी वसुली थांबवा अन्यथा आंदोलन , रिपाइंचा इशारा

Breaking News

मायक्रो फायनान्सकडून महिला बचतगटांची होणारी वसुली थांबवा अन्यथा आंदोलन , रिपाइंचा इशारा

 कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने सामान्य जनतेला जगणे असह्य झाले आहे . सध्या लॉकडाऊनच्या काळात मोलमजुरी , घरकाम करणाऱ्या सर्व महिला घरी बसून आहेत . हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे ,


त्यांनी ज्या कामाच्या आधारे बचत गट काढलेले होते ती कामे बंद असल्यामुळे बचत गटाचे हप्ते वेळेत भरल्या जात नाहीत . मात्र , सदर फायनान्स , बँका , बचत गट कंपन्या या त्यांना मानसिक त्रास देत आहेत . जोपर्यंत लॉकडाऊन शिथिल होऊन आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत अशा सर्व कंपन्या , बँका , बचत गटाचे हप्ते , मुजोरीने केली जाणारी कर्जाची वसुली थांबवावी , वेळापूर येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे कोविड केअर सेंटर सुरू करावे , १५ % निधीतून दलित वस्तीमध्ये जिवनावशक्य साहित्य वाटप करावे , माळशिरस तालुक्याध्ये वेळेवर ऑक्सीजन , व्हेंटीलेटर ,रेमडिसीवर इंजेक्शन , बेड , मिळत नसल्याने रुग्णांना मृत्युशी झुंज द्यावी लागत आहे तर नातेवाईकांचे बेड मिळविण्यासाठी अतोनात हाल होतात , त्यासाठी प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना करावी , रेमडिसीवर इंजेक्शन माळशिरस तालुक्यातील कोविड सेंटरला वेळेत मिळवीत , असे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदनाची गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तात्काळ आमलबजावणी करावी , अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा देण्यात आला . यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण धाईजे , तालुकाध्यक्ष नरेंद्र भोसले , तालुका सरचिटणीस मिलिंद सरतापे , आयटीसेल प्रमुख प्रविण साळवे , वेळापूर शहराध्यक्ष शरद साबळे , अकलूज युवक अध्यक्ष अभिजीत वाघमारे , भाजप तालुका सदस्य अजित साठे , राष्ट्रीय नाभिक संघटणा तालुकाध्यक्ष राहुल सराटे , राहुल धाईजे , प्रितम माने आदी उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments