सांगोला : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी स्वत : तहसीलदारांसह कर्मचाऱ्यांचा ताफा रस्त्यावर उतरला आहे . शहरात प्रवेश करायचा आहे तर आधी कोरोना चाचणी करा.पॉझिटिव्ह आला तर थेट कोविड सेंटरला खानगी , निगेटिव्ह आला तरच शहरात प्रवेश , अशी भूमिका घेतल्याने रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्यांवर चांगलाच चापबसला आहे .
दरम्यान , शुक्रवारी दिवसभर ७ ठिकाणच्या नाकाबंदीदरम्यान कोरोना चाचणीत तिघे जण पॉझिटिव्ह सापडले . त्यांची थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली . सांगोला शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललासांगोल्यात विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई मोहीम राबविताना तहसीलदार अभिजित पाटील व अन्य कर्मचारी आहे . प्रशासनाकडून कडक निबंध घालून संचारबंदी सुरू आहे . अशाही परिस्थितीत तरुण , अबालवृद्ध रस्त्यावर फिरताना दिसत आहेत तर दुचाकीवर मोकाट फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे . त्या अनुषंगाने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तहसीलदार अभिजित पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे व पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी संयुक्त बैठक घेऊन शहराला जोडणाऱ्या प्रमुख ७. रस्त्यावर नाकाबंदी करण्याचा निर्णय घेतला . त्यानुसार शुक्रवारपासून नाकाबंदीची अंमलबजावणी सुरू केली आहे . त्या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यासाठी २० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले . दरम्यान , तहसीलदार अभिजित पाटील स्वतः रस्त्यावर उतरले . त्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने वंदे मातरम चौकात शहरात प्रवेश करणाऱ्या दुचाकी - चारचाकी नागरिकांची सक्तीने कोरोना चाचणी करण्यास सुरुवात केली . शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकाला ते स्वतः रोखून अगोदर कोरोना चाचणी करा , मगच शहरात प्रवेश मिळेल , अशी भूमिका घेतल्याने नागरिकांना कोरोना चाचणीशिवाय पर्याय उरला नव्हता असे चित्र दिसून आले . या वेळी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ . सीमा दोडमनी , प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ . उत्तम फुले यांनी नाकाबंदीच्या ठिकाणी भेट दिली . पुढील सलग १० दिवस नाकाबंदीवर शहरात प्रवेश करणाऱ्यांची नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे .
0 Comments