सांगोला , दि . ३० ( प्रतिनिधी ) कोरोना पासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचे म्हणून मास्कचा वापर करणे गरजेचे आहे . तसेच सुरक्षित अंतर ठेवणे , गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका अशा सक्त सूचना महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आलेल्या आहेत . सर्वसामान्य नागरिकांनी मास्कन वापरल्यास दंडात्म क कारवाईला सामोरे जावे लागत आहे
.तर वाहन चालवताना नियमापेक्षा जास्त लोक आढळल्यास कारवाई केली जाते . याउलट मात्र सांगोला नगरपालिकेच्या कचरा वाहून नेहणान्या कर्मचान्यांकडून मास्क बापराबाबत दुर्लक्ष केले जात आहे . शहरातील विविध भागातून कचरा गोळा करणान्या कर्मचान्यांच्या तोंडाला अनेक वेळा मास्क नसल्याचे दिसून येते तर कधी मास्क गब्यात दिसतो त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नागरिकांना मास्क लावा अन्यथा कारवाई करू , असा उपदेश देणान्या नगरपालिका प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे घंटागाडी वरील कर्मचान्यांचे आरोग्य धोक्यात की नगरपालिका प्रशासनाला मास्कची अलर्जी आहे ? अशी चर्चा लोकांमधून होत आहे . सांगोला नगरपालिकेचे कचरा गोळा करणान्या घंटागाड्या आणि त्यावर करणारे चालक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत उल्लेखनीय कामगिरी आहे . गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संकट काळात हे कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याच्या हितासाठी रात्रंदिवस कचरा गोळा करण्याचे काम करतात.स्वतः च्या जीवाची परवा न करणान्या या कर्मचाऱ्यांची कौतुक करावे , तितके कमी आहे.कचरा गोळा करणान्या कर्मचान्यांच्या जीवावर सांगोला शहर स्वच्छ आणि सुंदर दिसतो . परंतु या ' आरोग्यदूत ' असणाऱ्या कर्मचा - यांच्या आरोग्याची फिकीर नगरपालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना नाही का ? कोरोना या कर्मचारी वर्गाला होणार नाही का ? असा संताप व्यक्त केला जात आहे . घंटागाडीवर काम करणारे कमीपगारावर काम करणारे कर्मचारी असले त्यांना जीव नाही का.त्यांना कुटुंब नाहीत का ? त्यांना सुरक्षा म्हणून सुरक्षित आणि दर्जेदार मास्क उपलब्ध करून देणे , वाहनांमध्ये सेनिटायझर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे . तसेच आरोग्य विषयक सोयी सुविधा दिल्या पाहिजेत . त्याची आरोग्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची नाही का ? आरोग्य विभागातील कर्मचारी शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्यासाठी कष्ट करतो . त्याच कटकरी कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या सुविधा देऊन त्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे . नगरपालिका प्रशासनाने माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांना आरोग्याच्या सुविधा प्याव्या अशी मागणी होत आहे . सकाळी सात वाजल्यापासून ते अगदी सायंकाळपर्यंत शहरातील विविध भागातून घंटागाड्या कचरा गोळा करतात प्रत्येक घरासमोर व दुकानासमोर जाऊन कचरा घेणे , तो कचरा घंटागाडीमध्ये विलगिकरण करून नगरपालिकेच्या कचरा डेपो टाकला जातो . याकामात शहरातील अनेक नागरिकांचा संपर्क कामगारांशी येत असतो.सांगोला शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे . अशा गंभीर परिस्थितीत कर्मचान्यांचे आरोग्य धोक्यात घालण्याचे महाभयंकर पापाचे धनी कोण आहेत ? असा सवाल उपस्थित होत आहे . कर्मचारी हा नगरपालिकेच्या कुटुंबातील एक महत्वाचा सदस्य आहे . प्रत्येक घटकाच्या आरोग्य व सुरक्षिततेची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे.कोरोनाच्या संकटात काम करताना आरोग्याला धोका निर्माण होऊ नये याची दक्षता घ्यावी घेणे गरजेचे आहे . अन्यथा सांगोला शहर स्वच्छ व सुंदर ठेवणान्या ' आरोग्यदूताचे ' आरोग्य | धोक्यात अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ,
0 Comments