सांगोला ( प्रतिनिधी ) : - ट्रन्सपोर्टद्वारे वाहनाने द्राक्षे , पपई भरुन पाठवलेला माल व्यापाऱ्यापर्यंत न पोहचवता ट्रक चालक - मालक यांनी ४ लाख ३५ हजार रुपयेचा माल व ६० हजार रुपये ऍडव्हान्स असे मिळून चार लाख ९ ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मार्केटिंग व्यवसायिक नवनाथ भोसले यांनी सांगोला पोलीसात दिली .
फिर्यादी नवनाथ गोरख भोसले ( रा . बामणी , ता . सांगोला ) यांचे आर्यन नावाचे रोडलाईझ ट्रन्सपोर्ट आहे . २५ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास आयशर वाहनामध्ये सांगोला - पंढरपुर रोडलगत असणाऱ्या गाळ्यात आर्यन नावाचे रोडलाईन ट्रान्सपोर्टद्वारे पपई , द्राक्षे माल भरण्यात आला होता . सदरचा माल बिहार ( पुर्णिया ) येथील व्यापारी याचेकडे पोहोच करणेचा होता . सदर वाहनामध्ये १० टन माल आजचे बाजारभावाप्रमाणे ४ लाख ३५ हजार रुपयेचा भरण्यात आला होता . चालक यास अँडव्हान्स ६० हजार रुपये देवुन येथून सदरचा माल बिहारमध्ये ठिकाणी पोहोच करण्यासाठी पाठवण्यात आला होता . सदरचे वाहन बिहार येथे दिनांक २८एप्रिल रोजी रात्री पोहोचणे अपेक्षित होते . ते वाहन वेळेवर न पोहोचल्याने वाहन चालकांस त्यांच्या मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही . त्यामुळे फिर्यादीने बिहार येथील व्यापाऱ्यांस फोनवर संपर्क साधला असता त्याना पाठवलेला पपई व द्राक्ष अध्याप पोहोच झाला नसल्याचे सांगितल्याने . स्वत : च्या फायद्या करीता सदर मालाची विल्हेवाट लावून फसवणूक केल्याची सांगोला पोलीसांत २ मे रोजी दिली आहे .
0 Comments