Breaking News

खबरदार! सोलापूर जिल्ह्यात लॉकडाऊन संपेपर्यंत बचत गटांची वसुली नको; जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या सूचना

सोलापूर शहरात महिनाभरापासून संचारबंदी आहे. ३१ मेपर्यंत संचारबंदी राहील.या काळात कामगारांचेरोजगार पार्श्वभूमीवर थांबले आहेत.आर्थिक अडचणी असल्यामुळे कामगारांकडून तसेच सर्वसामान्यांकडून बचत गटाच्या कंपन्यांनी हप्ते वसूल करू नयेत , असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंदशंभरकर यांनी दिले आहेत


संचारबंदी असल्याने कामगार, कष्टकरी , विडी कामगार महिला , बांधकाम कामगार , यंत्रमाग कामगार तसेच घरेलू कामगारांकडे बचत गटाचे हप्ते भरायला पैसे नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य कामगारांकडून बचत गटाचे हप्ते थकीत आहेत.या पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावली होती.

या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बचत गटांच्या कंपन्यांना सक्तीने हप्ते वसूल करू नयेत असे आदेश दिले तसे झाल्यास कंपन्यांवर कारवाई होईल , असेही त्यांनी कंपन्यांना सांगितले.या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे , आमदार प्रणिती शिंदे , जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांच्यासह संभाजी आरमारचे श्रीकांत डांगे , शिवाजी वाघमोडे , प्रहार संघटनेचे अजित कुलकर्णी , जमीर शेख यांच्यासह इतर संघटना व मायक्रो फायनान्सचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही बचत गटाच्या कंपन्यांनी हप्ते वसूल केल्यास कंपन्यांविरोधात तसेच प्रशासनाविरोधात जोरदार आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय संघटनांकडून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments