सांगोला / प्रतिनिधी : सांगोला तालुक्यांमध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाच्या आवाहानाला प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांच्याकडून कमी कालावधीमध्ये अत्यंत नियोजनबद्ध ५० ऑक्सिजनयुक्त मोफत बेडचे मेडशिंगी येथे कोव्हिड सेंटर सुरू केल्याने हा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन प्रांताधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले . ते मेडशिंगी येथील ऑक्सीजन युक्त कोव्हिड सेंटरच्या भेटीदरम्यान बोलत होते . पढे बोलताना ते म्हणाले , कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असताना काही रुग्णांची ऑक्सिजन लेवल कमी होत असल्याने प्रशासनाकडून येणारी मदत अपुरी पडत असल्याने तालुक्यातून तहसीलदार , मुख्याधिकारी यांच्याकडून सेवाभावी संस्था , दानशूर व्यक्तींना आवाहन करण्यात आले होते . याच धर्तीवर सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून अगदी कमी वेळामध्ये जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार यांनी ५० ऑक्सीजन बेडचे कोव्हिड सेंटर सुरू करून नागरिकांना दिलासा दिला आहे .
तहसीलदार अभिजित पाटील म्हणाले , तालुक्यामध्ये कोरोणा बाधित रुग्णांच्या संख्या मध्ये वाढ होत असल्याने तहसील विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन खाते सुरू करून लोकसहभागातून रुग्णांना सुविधा पुरवण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे . त्याच धर्तीवर हा अतुल पवार यांनी सामाजिक बांधिलकीने ५० बीडचा कोव्हिड सेंटर सुरू केल्याने इतर ही सेवाभावी संस्था दानशूर व्यक्तींनी असे उपक्रम हाती घ्यावेत असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे . यावेळी प्रांताधिकारी उदयसिंह भोसले , तहसीलदार अभिजीत पाटील , मुख्याधिकारी कैलास केंद्रे , पोलीस निरीक्षक सुहास जगताप , जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार उपस्थित होते .


0 Comments