Breaking News

राष्ट्रीय मानवाअधिकार तथा भ्रष्टाचार निवारणाच्यावतीने परंडा तालुक्यातील कोरोना योद्धांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत

 परंडा , दि . १ ९ ( प्रतिनिधी ) राष्ट्रीय मानव अधिकार तथा भ्रष्टाचार निवारण समितीच्या वतीने केंद्रीय उद्योग मंत्री दर्जा असलेले मंडळाचे सदस्य अलताब सय्यद यांच्या मार्गदर्शना खाली परंडा तालुक्यातील कोरोना योद्धांना राष्ट्रीय पुरस्काराने दि १८ रोजी राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांच्या हस्ते सन्मानीत 






कोरोनाच्या महामारीत स्वतः च्या जिवाची पर्वा न करता परंडा तालूका कोरोना मुक्त करण्या साठी योगदान देणाऱ्या , जिल्हा परिषेदेचे कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुके , पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे , पोलिस निरिक्षक मोमीन , सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने

विज वितरण कंपणीचे उप कार्यकारी अभियंता अमेय वनारी , कनिष्ठ अभियंता सचिन बुरुंगे , पोलिस कॉन्स्टेबल रामराजे शिंदे , पोलिस कॉन्स्टेबल कांबळे , यांना राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अविनाश ढगे , आसू चे सरपंच राहुल गाढवे . हालिंग राऊत , उप सरपंच अमोल जगताप , ग्राम पंचायत सदस्य श्रावण गणगे , रघुनाथ माने शाशीकांत खुने , भाऊराव मारकड , बळीराजा शेतकरी संघटणेचे जि अध्यक्ष हर्षद शिंदे , उपाध्यक्ष विकास औताडे , युवक जिल्हा उपाध्यक्ष सचिव औदुंबर ठोंगे , संघटक भिमराव जाधव , राष्ट्रीय मानवाधिकार संघटणेचे जिल्हा अध्यक्ष आश्रीनाथ गणगे , उपस्थित होते . पुणे येथील शेकडो गरीब कोरोना रूग्णाचे बील माफ करण्यासाठी संघटना रस्त्यावर आल्याने १ कोटी २५ लाख रुपये बील माफ करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे यांनी दिली .

Post a Comment

0 Comments