अनैतिक संबंधातून बायकोने केला नवऱ्याचा खून.. ; सांगोला तालुक्यातील गावडेवाडी येथील घटना
सांगोला तालुक्यातील गावडेवाडी येथे पत्नीने एका किराणा दुकानदारा बरोबर अनैतिक संबंध ठेवले होते. ते नवऱ्याला समजल्यामुळे बायकोने नवऱ्याचा घरामध्ये खून केल्याची घटना गावडेवाडी हंगिर्गे येथे दिनांक 20 मे रोजी घडल्याची नोंद सांगोला पोलिसात झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगोला तालुक्यातील गावडेवाडी येथील 24 वर्षीय महिलेने गावातील किराणा दुकानदार यांच्या बरोबर अनैतिक संबंध असल्याने अशा वाईट वागणूकी तिचा नवरा याने विरोध केल्याने हंगिर्गे गावडे वाडी येथील राहत असलेल्या घरात पिवळसर रंगाच्या लेसन बायकोने नवऱ्याचा गळा आवळून खून केला व हे कोणास समजू नये म्हणून तो घरात नसल्याचे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.म्हणून पुतण्याने चुलती विरोधात चुलत्याचा खून केल्याप्रकरणी सांगोला पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन कडील पोलीस करत आहे.


0 Comments