Breaking News

जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचे कडक निर्बंध लागूअत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार तर खाजगी वाहनांना पेट्रोल- डिझेल बंद किराणा दुकाने बंद मात्र घरपोच सेवा देण्यास मुभा

 जिल्ह्यात उद्यापासून १० दिवसांचे कडक निर्बंध लागूअत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार तर खाजगी वाहनांना पेट्रोल- डिझेल बंद किराणा दुकाने बंद मात्र घरपोच सेवा देण्यास मुभा 


सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दि. १८ रोजी परिपत्रक काढले त्यामध्ये असे नमुद केले, सोलापूर जिल्ह्यात प्रतिबंध लागू करूनही कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटणेसाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्त सोलापूर) ची हद्द वगळून सार्वजनिक हिताच्या दृष्टीने दिनांक २१ मे २०२१ रोजी सायंकाळी ७ वा. पासून ते दिनांक १ जून २०२१ रोजी सकाळी ७ वा. पर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश जारी केले आहे.

१) जिल्हात १४४ कलम नुसार रात्रीची संचारबंदी लागू

अ) संपुर्ण जिल्हामध्ये (पोलीस आयुक्तालय सोलापूर), हद्द वगळून १४४ कलम लागू

ब) सदर कालावधीत वैद्य कारणाशिवाय किंवा परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

क) सर्व अत्यावश्यक सेवा वगळून, सर्व आस्थापने, सार्वजनिक ठिकाणे, उपक्रम सेवा बंद

ड) अत्यावश्यक सेवेत असणाऱ्यांना सूट देण्यात येईल आणि त्यांच्या हालचाली उपक्रम प्रतिबंदीत नसतील.

इ) मुद्दा क्र.५ मध्ये नमूद केलेल्या (बाबी व आस्थापने) यांना सकाळी ७ वा. ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी असेल.

२) अत्यावश्यक सेवेमध्ये खालील बाबींचा समावेश असणार.

१) रुग्णालय, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण केंद्र, वैद्यकिय विमा कार्यालय, औषध कंपन्या, इतर वैद्यकिय आणि आरोग्य सेवा व सदर सेवा पुरवणारी उत्पादक केंद्रे, वाहतूक व पुरवठा साखळीस परवानगी, लसीकरण, सॅनीटायझर, मास्क, व वैद्यकिय उपकरणे व अवश्य सेवांना लागणारा कच्चा माल व त्याच्याशी संबंधित उत्पादन व वितरण.

२) व्हेटीनरी हॉस्पिटलम, अॅनिमल केअर शेल्टर्स व पेस्ट शॉप्स.

३) घरपोच दुध वितरणास सकाळी ६ ते ९ या निर्धारित वेळेत असेल.

४) शिवभोजन थाळी योजना फक्त पार्सल सुरू.

५) शीतगृहे व गोदाम सेवा.

६) स्थानिक प्राधिकरणांच्या मान्सूनपुर्व उपक्रम.

७) स्थानिक प्राधिकरणाच्या सर्व सेवा.

८) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे विहित सर्व सेवा सुरु.

९) भारतीय सुरक्षा आणि विनिमयन मंडळ चे कार्यालये आणि मान्यताप्राप्त बाजार मूलभूत संस्था उदा. स्टॉक एक्सचेंज, डिपॉजिटर्स व क्लेअरिंग कॉपरेशन कडे नोंदणीकृत एजंट.

१०) टेलिकॉम सेवेतील दुरुस्ती व देखभाल पुरवणाऱ्या सेवा.

११) वस्तूंची वाहतूक.

१२) पाणीपुरवठा सेवा.

१३) ई – व्यापार फक्त अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरवणेसाठी.

१४) प्रसार माध्यमे (मीडिया).

१५)  पेट्रोल व डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवेतील खाजगी व शासकीय वाहने, वैद्यकीय सुविधा पुरवणारी वाहने, शासकीय धान्य पुरवठा करणारी वाहने, प्रसार माध्यमे, वृत्तपत्रे मीडियाचे कर्मचारी, मालवाहतूक करणारी वाहने इ.साठीच सुरु, मात्र ओळखपत्र असणे आवश्यक आहे.

१६) सर्व प्रकारची मालवाहतूक सेवा सुरु.

१७) शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा सुरु.

१८) विद्युत व गॅस पुरवठा सेवा सुरू 

१९) एटीएम (ATM)

२०) टपालसेवा.

२१) लस, औषधे, जीवनावश्यक, संबधितित वाहतूक हाताळणारे कर्मचारी, परवानाधारक मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स.

२२) कोणत्याही अत्यावश्यक सेवेचा कच्चामाल व त्यांची पॅकेजिंग मटेरिअल ची उत्पादन केंद्रे.

२३) रास्तभाव धान्य दुकाने (रेशन दुकाने) सकाळी ७ ते ११ या कालावधीत सुरू राहतील.

● नमूद असलेल्या सेवांची अमलबजावणी करून घेणाऱ्या संस्थानी बाबींचे पालन करणे बंधनकारक आहे.

● आवश्यक दुकानांनी खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक.

अ) संबंधित अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक व कामगार, कर्मचारी व ग्राहक हे covid-19 च्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतील.

ब) अत्यावश्यक सेवेतील दुकान मालक व कामगार यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे लवकरात लवकर लसीकरण करावे. सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकानांनी योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करून घ्याव्यात. उद. विक्रेता व ग्राहक यामध्ये पारदर्शक काच किंवा इतर साहित्यांचे कवच, इलेक्ट्रॉनिक पेमेंट चा वापर.

क) अत्यावश्यक सेवेतील दुकानातील मालक कर्मचारी किंवा ग्राहक यांनी वरील नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर ५०० रुपये दंड आकारला जाईल. जर एखादा ग्राहक covid-19 विषयक नियमांचे पालन करत नसताना संबंधित दुकानातून जर सदर ग्राहक सेवा दिली जात असेल तर सदर दुकानावर १००० रुपये दंड आकारला जाईल. सदर नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून जितक्या कालावधीसाठी covid-19 आपत्ती म्हणून अधिसूचित असेल तितका कालावधीत संबंधित आस्थापन/दुकान बंद केले जाईल.

ड) अत्यावश्यक सेवा संबंधित कार्य करीत असलेल्या व्यक्तींच्या प्रवास हालचालीवर नमूद १ (ब) नुसार वगळण्यात येत आहे.

इ) सद्यस्थितीत बंद असणाऱ्या दुकानाचेे मालक यांनी केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे त्यांच्याकडे काम करत असणाऱ्या सर्व कामगारांचे लसीकरण करून घ्यावे. तसेच त्यांना पारदर्शक काच किंवा इतर साहित्याचे कवच आणि डिजिटल पेमेंट वापरून ग्राहकांशी संवाद साधणेसाठी तयार करावे. जेणेकरून शासनास सदरची दुकाने लवकरात लवकर खुली करता येईल.

३) जिल्ह्यात (पोलीस आयुक्त कार्यालयाची) हद्द वगळून खालील बाबी पूर्ण बंद राहतील.

i) सर्व किराणा दुकाने भाजीपाला, फळविक्री, पाळीव प्राण्यांचे खाद्य पदार्थांची दुकाने, तसेच सर्व किरकोळ व ठोक विक्रेते इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने व आस्थापने बंद राहतील.

ii)  उपहारगृह, लॉज, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बाजार मार्केट बंद राहतील,

iii) वाईन शॉपी, बिअर बार शॉपी, देशी दारू दुकाने व तत्सम आस्थापने बंद राहतील.

iv) सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, बेकरी, किरकोळ व ठोक विक्रीचे ठिकाणे, भाजी मार्केट/फळे विक्रेते/आठवडी व दैनिक बाजार बंद.

 v) मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादींची विक्री बंद.

vi) रस्त्यांच्या कडेला असणारी खाद्यपदार्थ विक्रेते पूर्णपणे बंद राहतील.

ब) सर्व किराणा माल, भाजीपाला, फळ विक्री व पाळीव प्राण्यांचे खाद्य पदार्थांची दुकाने यांना सकाळी  ७ ते ११ या कालावधीत घरपोच सेवा देण्यास मुभा राहील. तसेच कृषी अवजारे व शेती उत्पादनाची संबंधित कृषी सेवा केंद्र दुकाने सकाळी ७ ते सकाळी ११ या कालावधी सुरू राहतील.

४) प्रवासी वाहतूक

अ) सार्वजनिक वाहतूक –

१) महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा जिल्हा अंतर्गत पूर्णपणे बंद राहील.

२) सार्वजनिक वाहतूक उदा. रिक्षा, टॅक्सी अत्यावश्यक सेवेसाठी खालील क्षमतेप्रमाणे सुरू राहतील.

● रिक्षा चालक + २ प्रवासी.

●टॅक्सी चालक + RTO नियमानुसार ५०%  प्रवासी.

ब) खाजगी वाहतूक –

अ) सर्व खाजगी प्रवासी वाहतूक अतीतात्काळ व अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहील, खाजगी बसेस वगळता, खाजगी प्रवासी वाहतूक हि फक्त आपत्कालीन किंवा अत्यावश्यक सेवा किंवा वैद्य करण्यासाठी वाहन चालक + प्रवासी आसन  क्षमतेच्या ५०% प्रवासी. क्षमतेने सुरू राहील. मात्र प्रवासी वाहतूक अंतर जिल्हा अंतर शहर असणे अपेक्षित नाही. ती प्रवाशांच्या राहत्या शहरापुरतीच असेल.

● अंतर जिल्हा किंवा अंतर शहर प्रवासी वाहतुक फक्त अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या किंवा आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत किंवा अंत्यसंस्कारासाठी किंवा कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असल्यास परवानगी असेल मात्र त्यांना परवानगी असावी.

● रेस्टॉरंट बार हॉटेल-

i) एकत्रित बसून सेवा देणे बंद राहील. मात्र घरपोच पार्सल सुरू राहील.

● वर्तमानपत्रे/मासिके, नियतकालिके –

छापाई व वितरणास परवानगी असेल, तसेच घरपोच सेवा सुरु राहील.

● करमणूक, दुकाने, मॉल्स, शाॅपिंग सेंटर, सिनेमागृहे व नाट्यगृह, सभागृहे बंद राहणार.

● धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहणार.

Post a Comment

0 Comments