विज्ञान महाविद्यालयात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी
विज्ञान महाविद्यालय सांगोला येते महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली सुरुवातीला प्रमुख पाहुणे अमर स्वामी अमर कलेक्शन प्रा दीपक रिटे महाविद्यालयाचे ओ एस शामराव ठोंबरे गाडे अमोल दशरथ रणदिवे यांच्या हस्ते बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपले मनोगत व्यक्त करताना अमर स्वामी म्हणाले की बसवेश्वर महाराज यांनी कर्म करत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहा अशी शिकवण दिली आहे ती समाजाला आज प्रेरक ठरत आहे बाराव्या शतकातील समाज व्यवस्थेच्या विरोधातील बंडखोर संत म्हणून बसवेश्वर यांचा उल्लेख करावा लागतो रूढी परंपरा चालीरीती यांच्या विरोधात आवाज आवाज उठवला तेव्हा त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपण जगले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला महाविद्यालयामध्ये संत व राष्ट्रीय पुरुष यांच्या जयंती साजरी करण्या पाठीमागचे भूमिका स्पष्ट करताना प्रा दीपक रिटे म्हणाले की महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील श्रेष्ठ संत व समाज सुधारक होते त्यांनी हिंदू धर्म जाती व्यवस्थेविरुद्ध व अनिष्ट प्रथांविरुद्ध संघर्ष केला त्यांनी निर्गुण निराकार व एकेश्वरवादी श्रद्धेचा पुरस्कार केला बसवेश्वरांनी कर्म विधी ना विरोध केला
त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर मला आधीच लिंग दीक्षा मिळाली आहे असे म्हणून मुंज करण्याचे नाकारले आणि घर सोडून निघून गेले कुंडल संगम येथे वास्तव्य केले त्यांनी भाषा धर्म व तत्त्वज्ञान याचा सखोल अभ्यास केला विवाह झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे ते वास्तव्यास आले मंगळवेढा येथे लोकशाही सनद म्हणजेच अनुभव मटपाची स्थापना केली या अनुभव मटपात सर्व जाती धर्मातील लोक एकत्र येऊन सामाजिक अडचणीवर कशी मात करावी यावर चर्चा करत असे समाजातील रूढी परंपरा चालीरीती अंधश्रद्धा यांना विरोध करून समाजाच्या हितकारक गोष्टींची अंमलबजावणी करणारी नवीन यंत्रणा त्यांनी तयार केली महात्मा बसवेश्वर हे बाराव्या शतकातील आदर्श प्रशासक समतेचे प्रणेते म्हणून ओळखले जातात त्यांनी वचन साहित्यातून समता मूल्य न्याय बंधुता एकात्मता तसेच स्वातंत्र्य अधिकार नियंत्रण शिस्त सुशासन आणि प्रशासन आधी बाबीवर सखोल विवेचन केले आहे सद्यस्थितीत शासन व प्रशासनाला या विचारणा चा अवलंब केल्यास निश्चितच देशात निर्माण होणारे विषमता हिसा भेदभाव जातीय राजकारण इत्यादी समस्यांवर आळा घालता येईल असा आशावाद प्रा दीपक रिटे यांनी व्यक्त केला तेव्हा अशा या थोर संताचे व समाजसुधारकांचे विचार विद्यार्थ्यांनी आत्मसात करून जीवन जगले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दीपक रिटे यांनी केले आभार अमोल गाडे यांनी मानले यावेळी अमर स्वामी यांनी महात्मा बसवेश्वर यांची प्रतिमा महाविद्यालयाला भेट म्हणून दिली कार्यक्रमाला उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून पार पाडण्यात आला



0 Comments