सांगोला तालुक्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक ; काल तब्बल १४२ जणांना कोरोनाची नव्याने बाधा !
सांगोला / प्रतिनिधी : सांगोला शहर आणि तालुक्यात एका दिवसांत १४२ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली आहे .त्यामध्ये सांगोला शहरातील २० तर ग्रामीण भागातील १२२ जणांचा समावेश आहे . शासनाच्या नियमानुसार संचारबंदी व निबंध तसेच लॉक डाऊन जाहीर केले असले तरी काल कोरोना बाधित रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे . गावनिहाय रूग्ण संख्या पुढील प्रमाणे ;- सांगोला शहर- २०, महूद- १३ , घेरडी- १२ , खवासपूर- ९ ,अजनाळे -७, अकोला -७ , हातीद ६ , पाचेगाव खुर्द- ५ , खिलारवाडी -४, किडबिसरी -४, अचकदाणी-४ , वाकी शिवणे-४ , लोणविरे - ४ , मांजरी-३ , मेडशिंगी-३ , य.मंगेवाडी-३ , जुनोनी -३, लोटेवाडी-३ , चिक - महूद-३ , वाटंबरे-२ , वाकी-२ , मांजरी-२ , संगेवाडी-२ , चोपडी-२ , सोनंद-२ , तिप्पेहळी -२, जवळा- २ , गायगव्हाण -१, वाढेगाव-१, शिवणे -१,महिम -१, देवकते वाडी-१, झापाचीवाडी-१ लिगाडेवाडी-१, डोंगरगाव -१ अश्या १४२ जणांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे . तर १०२ जाणांनी कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी १ हजार २७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत .कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने पुन्हा एकदा तालुक्यावर संकट आले आहे . तालुका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार सध्या यामध्ये १०० जणांचा मृत्यू झाला आहे . आज अखेर सांगोला तालुक्यात एकूण ६ हजार २४५ नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे . पैकी ५ हजार ४१८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अशी माहिती सांगोला तालुका आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे .


0 Comments