‘म्युकरमायकोसिस’ आजारावरील उपचाराबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले ‘हे’ नवे निर्देश एकीकडे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असून, दुसरीकडे म्युकर मायकोसिस हा आजार देखील राज्यात पसरत आहे. mucormycosis हा काळ्या बुर्जीजन्य आजार असलेल्या व्यक्तीमध्ये पसरत आहे. रुग्णाची संख्याही वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती कक्षात उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली.बैठकी दरम्यान बोलताना अजित पवार म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत म्युकर मायकोसिसवर (mucormycosis ) उपचार करणाऱ्या १३१ रुग्णालयांची यादी प्रसिध्द करा, या आजारावरील रुग्ण संख्येची अपडेट नोंद पोर्टलवर करा. कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही’ असे पवार यांनी म्हटले आहे. तसेच, म्युकरमायकोसिसच्या आजाराचे प्रथम टप्प्यात निदान झाल्यावर तात्काळ औषधोपचार सुरू केल्यास हा आजार बरा होतो. म्हणून या रुग्णांवर पहिल्या टप्प्यात उपचार सुरू करण्यात यावेत, त्यामुळे या आजारामुळे कोणाला जीव गमवावा लागणार नाही. असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे.अजित पवार पुढे म्हणाले, म्युकर मायकोसिसच्या (mucormycosis ) आजारावरील औषधांचे नियंत्रण केंद्राच्या हाती असल्याने प्रत्येक जिल्ह्यांनी या आजाराची रुग्णांची अद्ययावत नोंदणी पोर्टलवर करावी. यावरून आपल्याला औषधांची उपलब्धता होणार आहे. हाफकीन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून काही प्रमाणात या आजरावरील औषधांची निर्मिती होणार आहे. आणि ग्लोबल टेंडरद्वारे या औषधांची उपलब्धता आपल्याला होणार आहे, म्हणून पुढील महिन्यात काही प्रमाणात या औषधांची उपलब्धता सुरळीत होऊ शकणार आहे. परंतु, रेमडीसीव्हीर प्रमाणेच जिल्हा प्रशासनाद्वारे मायकोसिसच्या औषधांचे योग्य आणि प्रभावीपणे वितरण करण्याच्या सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या आहे.


0 Comments