स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटक राज्यातून येणाऱ्या गुटख्यावर धडाकेबाज कारवाई...
43 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त..
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील यांना कर्नाटक राज्यातून येणाऱ्या अवैध गुटख्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे पोलीस उपनिरीक्षक अमित सिद-पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकास सविस्तर मार्गदर्शन करुन सांगोला येथे वाहनांवर लक्ष देण्या कामी पाठवले होते. त्यावरून त्यांना दिनांक 25 मे रोजी सकाळी 7:04 वाजताच्या सुमारास बातमीतील वाहन दिसून आल्याने त्याची तपासणी करून त्यातील 150 पोती हिरा पान मसाला, 78 पोती रॉयल 717 सुगंधित तंबाखू , व ट्रक क्रमांक एम एच 21 एक्स 1947 असा एकूण 43 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच ट्रक चालक व त्याचा एक साथीदार यांना जागीच ताब्यात घेण्यात आले आहे पुढील कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर सांगोला पोलीस स्टेशन येथे गुरनं 626/2021, भा.द.वि.क.328,188, 272, 273, 34, अन्न व सुरक्षा मानदे कायदा क 26(2)(i), 26(2)(ii), 26(2)(iv), सह क 27(3)(e) वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा प्रतिबंधित पानमसाला व सुगंधित तंबाखू कोठून घेऊन आले व कोठे विक्रीसाठी घेऊन जात होते या संबंधीचा पुढील तपास सुरू आहे.सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते, सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.सर्जेराव पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री.अमित सिद-पाटील, सहा.फौ.शिवाजी घोळवे, पो.ह.विजय भोसले, पो.ह. दिलीप राऊत, पो.ना. हरिदास पांढरे, पो.ना. रवी माने, पो.ना. गणेश बांगर, पो.काॅ सचिन गायकवाड, चापो.काॅ. केशव पवार सर्व नेमणुकी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांच्यासह सायबर पोलिस स्टेशनचे पो.काॅ अन्वर अत्तार यांनी पार पाडली आहे.


0 Comments