नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे .
कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी औषध , लस कंपन्या भारतात आणत आहेत . अॅण्टीबॉडी कॉकटेल ' असं या औषधाचं नाव असून , अॅण्टीबॉडी कॉकटेल हे दोन वेगळ्या अॅण्टीबॉडीपासून तयार करण्यात आलेलं असून , प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेलं आहे . अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ' अॅण्टीबॉडी कॉकटेल ' उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता . आता केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे . आता कोरोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो , एआयजी रुग्णालयाने ' अॅण्टीबॉडी कॉकटेल'चा उपचारात वापर करणं सुरु केलं आहेत . त्याचबरोबर नव्या म्यूटेशनवर ते किती प्रभावी आहे , यावरही . अभ्यास केला जात आहे , असं रेड्डी म्हणाले . या औषधाच्या वापरामुळे कोरोना रुग्ण एका आठवड्यातच आरटी - पीसीआर टेस्ट निगेटिव्ह होऊ शकतो . कोरोनाच्या डबल म्युटेशनवर अॅण्टीबॉडी कॉकटेल ' किती प्रभावी आहे , याचा आम्ही एआयजीमध्ये अभ्यास करत आहोत , असं रेड्डी म्हणाले . " अॅण्टीबॉडी कॉकटेलच्या परिणामाबद्दलचे पुरावे अद्याप स्थापित होऊ शकलेले नसले , तरी न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिनसह विविध जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या परीक्षण उत्साहवर्धक आहेत . अॅण्टीबॉडी कॉकटेलमुळे रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची वा मृत्यूची शक्यता 70 टक्क्यांनी कमी होते , " असंही रेड्डी म्हणाले .


0 Comments