मुंबई - कोरोनाच्या संकटकाळात मुस्लिम समाजाने आयसोलेशन सेंटर उभारण्यासाठी देशातील अनेक मस्जिदी व मदरसे खुले केले आहेत . तर प्लाज्मा थेरपीसाठी अनेकांनी रक्तदान केले .
रमजानच्या कडक उपासादरम्यान घरात आराम करण्याऐवजी भर उन्हात शहरे सोडन पायपीट करत आपापल्या गावी , जिल्हा व राज्यात जाणान्या गोरगरिबांना अन्न , धान्य , पाणी वाटप करून आपली दानत सिद्ध केली आहे . जकात ( अनिवार्य दान ) हा इस्लाममधील ५ स्तंभापैकी एक स्तंभ . या तत्वान्वये आपल्या ठराविक संपत्तीच्या बचतीवर १ वर्ष उलटल्यावर त्या संपत्तीवर अडीच टक्के रक्कम समाजातील गरजवंतांमध्ये दान करावी लागते असा आहे . मुस्लिम समाज दरवर्षी रमजानचे औचित्य साधून ही रक्कम समाजातील गरजवंतांमध्ये , दिन दुबळ्यांवर खर्च करत असतो . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने केलेल्या आवाहनानुसार समस्त मुस्लिम समाजाने आपापली जकातची रक्कम व सदका ( ऐच्छिक दान ) ची रक्कम सोबतच ईदच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी तब्बल ६० लाख रुपये दिले आहेत . या रकमेतून इंदिरा गांधी असामान्य रुग्णालयात १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आला आहे . रमजान ईदचे औचित्य साधून याचे लोकापर्ण करण्यात आले
0 Comments