मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी केली जात आहे. त्यामुळे अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा नाहीतर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जाऊ लागू शकते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये,
असे आवाहन केले होते. यापूर्वी जेव्हा कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला होता तेव्हा अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडल्यास पोलिसांकडून लाठीचा प्रसाद दिला जात होता. मात्र, आताही अशाचप्रकारे कारवाई होणार का असे प्रश्न मनात निर्माण झाले आहेत.लॉकडाऊनमुळे आधीच लोकं नाराज आहेत . त्यामुळे आता पुन्हा आक्रमक कारवाई केल्यास ही नाराजी ओढावू शकते . आता करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अजून तरीही पोलिस प्रशासन सौम्य भूमिकेत असल्याचे दिसत आहे . तसेच लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या टप्प्यात पोलिस नागरिकांना विनंती करताना पाहायला मिळतील .
मात्र , तरीही अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी न झाल्यास पोलिस पुन्हा एकदा कडक कारवाई करण्यास सुरुवात करतील , असा अंदाज आहे . दरम्यान , अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका . आपण आपली स्वतःची काळजी घ्या . कलम 144 लागू होणार असून , 5 पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत . मात्र , नियम मोडले तर लाठीचा वापर केला जाईल , असा इशारा राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी यापूर्वीच दिला आहे .
0 Comments