google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर तालुक्यात 301अॅक्टिव्ह रुग्ण

Breaking News

सांगोला शहर तालुक्यात 301अॅक्टिव्ह रुग्ण

 सांगोला:-कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या 1 वर्षभरात सांगोला तालुक्यातील ५५ हजार २२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली . त्यात ३ हजार ६११ ... कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी गेल्या वर्षभरात सांगोला तालुक्यातील ५५ हजार २२७ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली .


त्यात ३ हजार ६११ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत . कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६६ जणांचा मृत्यू झाला आहे . तर ३२४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे . सिंहगड कोविड सेंटरमध्ये ७४ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल केले आहे . तर १६६ जण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत . सध्या तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता भविष्यात आणखी कोरोना केअर सेंटरची गरज आहे . गतवर्षी एप्रिल महिन्यात असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा या वर्षी तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक दिसत आहे . मृत्युदरही अधिक असल्यामुळे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे . नागरिकांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी तोंडाला मास्क लावणे , गरज असेल तरच घराबाहेर पडणे , सोशल डिस्टन्सिंगचे अंतर ठेवणे , स्वतःला कोरोनापासून दूर ठेवणे अशी काळजी घेतली तरच आपण कोरोनापासून मुक्त होणार आहोत अन्यथा सर्वांनाच गंभीर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे . रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे . कोरोना रुग्ण सापडलेल्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र तयार करणे , रुग्णांच्या व्यक्तींच्या टेस्ट करणे , यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे . तालुक्यातील महूद , यलमार मंगेवाडी , मांजरी , कडलास , गायगव्हाण , वाटंबरे या गावात रुग्णसंख्या वाढल्याने त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments