google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दोन विद्यार्थ्यांनी वर बलात्कार एक तीन महिन्याची गरोदर आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Breaking News

दोन विद्यार्थ्यांनी वर बलात्कार एक तीन महिन्याची गरोदर आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार

 नागपूर : शहरात महिला , युवती आणि अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे . गेल्या आठवड्याभरात सहा तरुणी व अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची पोलिस दप्तरी नोंद आहे . तर आजही शांतीनगर आणि कोराडी हद्दीत राहणाऱ्या दोन शाळकरी विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे .


१७ वर्षीय मुलीला वडील नसून आई , आजी , भाऊ आणि बहिणीसोबत ती शांतीनगर राहते . मुलगी त्याच " परिसरातील एका शाळेत शिकते . मुलीची आई ही मोलमजुरी करून कुटुंबाचा चरितार्थ चालविते . आईला हातभार म्हणून मुलगी देखील त्याच परिसरात एका घरी काम करते . त्याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे . या कामावर खरबी येथील राजू कोटरंगे ( ३२ ) हा कामाला होता . मुलगी रस्त्याने जात असताना त्याची तिच्यावर नजर होती .१० एप्रिलला सायंकाळी काम संपवून मुलगी घरी जात होती . त्याचवेळी राजू हा दुचाकीने तिच्याजवळ आला आणि ' तू मला आवडतेस , सोबत फिरायला चलते का ? ' असे म्हटले . घाबरल्याने मुलगी आपल्या घरी निघून गेली . रविवारी सायंकाळी राजूने पुन्हा तिला गाठल . तिचा हात पकडून ठार मारण्याची धमकी दिली . त्याचप्रमाणे बळजबरी दुचाकीवर बसवून कोराडी हद्दीत आर्यनगर येथील एका बांधकामाच्या ठिकाणी नेले आणि बलात्कार केला . रात्री आठच्या सुमारास मुलगी घरी आली . तिच्या आईने तिला विचारणा केली असता रडायला लागली . तिने घडलेला प्रकार आईला सांगितला . याप्रकरणी शांतीनगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून राजू कोटरंगे यास अटक केली . > वर्गमैत्रिण झाली गर्भवती एकाच शिकत असताना १७ वर्षीय मुलीसोबत वर्गमित्राची ओळख झाली . दोघांची मैत्री झाली . दोघेही सोबतच शाळेत ये - जा करीत होते . दोघेही वर्षभरापासून एकमेकांवर प्रेम करीत होते . दोघांनीही अकरावीत प्रवेश घेतला . दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . मात्र , दोघांचेही वय केवळ १७ वर्षे होते . शारीरिक आकर्षणापोटी त्याने तिला १० एप्रिल २०२० ला पांजरा येथील झुडुपात नेऊन शारीरिक संबंध केले . त्यानंतर दोघांनी वारंवार जंगलात जाऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले . फेब्रुवारी २०२१ पर्यंत तिच्यावर बलात्कार केला . यादरम्यान मुलगी गर्भवती झाली . तीन महिन्यांची गर्भवती झाल्यामुळे दवाखान्यात जाण्याची त्यांना भीती वाटत होती . तिच्या पोटात दुखत असल्यामुळे प्रियकराने सक्करदयातील एका खासगी रुग्णालयात नेले . तेथे मुलीचे वय आणि सोबत असलेला मुलगा यावरून डॉक्टरांनी प्रकार लक्षात आला .

Post a Comment

0 Comments