Breaking News

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, 10 लाखासाठी तगादा लावणाऱ्या पतीसह 5 जणांवर FIR

 सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, 10 लाखासाठी तगादा लावणाऱ्या पतीसह 5 जणांवर FIR


 बुलढाणा : जेसीबी घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा सासरच्या मंडळीनी लावल्याने कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बेलगाव (जि. बुलढाणा) येथे मंगळवारी (दि. 6) सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल  केला आहे.प्रतीक्षा वानखेडे (रा. बेलगाव, जि. बुलढाणा)  असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पती गजानन वानखेडे आणि त्याचे आईवडील बालाजी वानखेडे व मंदोदरी वानखेडे यांच्यासह मनिषा रामेश्वर बोडखे आणि अश्विनी सोमेश बाजड आदीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मृत प्रतिक्षाच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मृत प्रतिक्षाकडे आरोपीनी जेसीबी घेण्यासाठी माहेरवरून 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावला होता. त्यासाठी त्यांनी प्रतिक्षाचा वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला होता. त्यामुळे सासरच्या त्रासाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments